.तर मला जरूर फाशी द्या- मार्कंडेय काटजू

0
11

वृत्तसंस्था
नवी दिल्ली- राष्ट्रपिता महात्मा गांधी व नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्याबाबत वादग्रस्त केल्याप्रकरणी तीव्र निषेध करणारा ठराव राज्यसभेने मंजूर केला असून, मला हे मंजूर नाही. शिक्षा द्यायची असेल तर मला जरूर फाशीची शिक्षा देण्यात यावी, असे सर्वोच्च न्यायालयाचे माजी न्यायाधीश मार्कंडेय काटजू यांनी म्हटले आहे.

काटजू यांनी ब्लॉगवर म्हटले आहे की, ‘ओह, आश्‍चर्यजनक माहिती. माझ्या वक्तव्यावर राज्यसभेने तीव्र निषेध करणारा ठराव मंजूर केला आहे. मी जे काही वक्तव्य केले आहे, त्यावर जरूर शिक्षा करावी. परंतु, सर्वोच्च न्यायालयाचा न्यायाधीश म्हणून सेवानिवृत्त झाल्यानंतर मला ज्या सुविधा मिळत आहेत, त्या काढून घेण्याचा प्रयत्न केला जात आहे. काही चुकत असेल तर मला खुशाल फाशीची शिक्षा द्या.‘

ते पुढे म्हणाले, ‘राज्यसभेतील सदस्यांमध्ये विचारांचा अभाव आहे. असा प्रस्ताव मंजूर करायला हवा होता की, मी, भारतामध्ये आल्यावर तत्काळ अटक करून फाशीवर लटकावयाला पाहिजे. ‘न रहेगा बांस न बजेगी बांसुरी‘

दरम्यान, काटजू यांनी महात्मा गांधी यांना लक्ष्य करत ते ब्रिटिशांचे एजंट असल्याचे ब्लॉगवर म्हटले होते. आहे. काटजू म्हणाले, “महात्मा गांधींनी देशाचे खूप मोठे नुकसान केले आहे. बापूंनी राजकारणात धर्माला घुसवून “फोडा आणि राज्य करा‘ हे ब्रिटिशांचे धोरण पुढे सुरू ठेवले. बापू आपल्या प्रत्येक भाषणांत रामराज्य, ब्रह्मचर्य, गोरक्षा यांसारख्या हिंदुत्ववादी विचारांचे उल्लेख करायचे. त्यामुळे मुस्लिम लीगसारख्या संघटनांकडे जास्तीत जास्त मुस्लिम नागरिक आकर्षित झाले. महात्मा गांधींनी क्रांतिकारी आंदोलनाला सत्याग्रही आंदोलनाकडे नेत ब्रिटिश राजवटीला फायदा करून दिला. गांधींचींचे आर्थिक विचारही ढोंगीपणाचे होते.‘