आश्रमशाळेतील मुलीचा संशयास्पद मृत्यू

0
12

लातूर :तालुक्यातील काटगाव तांडा येथील साने गुरुजी आश्रमशाळेत इयत्ता सहावी वर्गातील १२ वर्षीय मुलीचा संशयास्पद मृत्यू झाल्याने एकच खळबळ उडाली. आश्रमशाळेतील शिक्षकांनी मयत मुलीबाबत पालकांना दिलेली माहिती आणि मयत मुलीच्या भावाने पालकांना सांगितलेली हकीकत यात तफावत असल्याने मुलीच्या मृत्यूमागचे गूढ वाढले आहे. पालकांच्या गैरहजेरीत मयत मुलीचे शवविच्छेदन झाल्याने आश्रमशाळेतील शिक्षक व डॉक्टरांवरही संशयाची सुई फिरत आहे.
काटगाव तांडा येथील साने गुरुजी आश्रमशाळेत इयत्ता सहावी वर्गात शिक्षण घेणा-या एका विद्यार्थिनीस दि. २५ मार्च रोजी सकाळी ७ वाजण्याच्या सुमारास लातूर येथील शासकीय सर्वोपचार रुग्णालयात दाखल करण्यात आले. परंतु ती मयत असताना दवाखान्यात आणल्याचे डॉक्टरांचे म्हणणे आहे. आश्रमशाळेतील शिक्षकांनी सकाळी ९ च्या सुमारास मयत मुलीच्या वडिलांना फोन करून मुलगी आजारी आहे. तिला ग्लुकोज लावण्यात आले आहे. लवकर या, असा निरोप दिला, असे मुलीच्या वडिलाचे म्हणणे आहे तर त्याच आश्रमशाळेत शिकत असलेल्या मयत मुलीच्या भावाने आश्रम शाळेतील शिक्षक बहिणीला नेहमी त्रास देत होते.