‘रेल्वेने नाकारली आंबेडकर जयंतीची सुटी’

0
6

नागपूर–दरवर्षी १४ एप्रिल रोजी देण्यात येणारी डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीची सुटी रद्द करून केंद्रात सत्तारुढ भाजप सरकारने आपल्या मनुवादी प्रवृत्तीचा परिचय करून दिला आहे, अशी टीका बसपाने केली आहे.

डॉ. आंबेडकरांची जयंती देशात ज्या प्रमाणात साजरी होते, त्या प्रमाणात अन्य कुणाचीही होत नाही. त्यामुळे दरवर्षी १४ एप्रिलला आंबेडकर जयंतीची शासकीय सुटी दिली जाते. मात्र, भारतीय रेल्वेने यंदा जी १६ सुट्यांची यादी जाहीर केली आहे, त्यात गांधी जयंतीची सुटी आहे, मात्र आंबेडकर जयंतीची सुटी नाही. ऐच्छिक सुट्या म्हणून ज्या ३२ सुट्यांची यादी दिली त्यात १४ एप्रिल रोजी सुटी दाखविली आहे. मात्र, त्या दिवशी वैशाखी असल्याचे दर्शविले आहे. उद्या कदाचित दिलगिरी व्यक्त करून आंबेडकर जयंतीची सुटी जाहीर करण्यातही येईल, पण मुळात हा विसरच का पडला, असा प्रश्न बसपाचे प्रदेश मीडिया प्रभारी उत्तम शेवडे यांनी पत्रकाद्वारे केले आहे.