सायना बनली वर्ल्ड नंबर वन खेळाडू

0
11

नवी दिल्ली -सायना नेहवालने बॅडमिंटनमध्ये जागतिक स्तरावर पहिले रँकिंग प्राप्त केले असून या स्थानावर हक्क सांगणारी ,विश्‍वविक्रम करणारी ती पहिली भारतीय महिला बॅडमिंटनपटू ठरली आहे. सायना नेहवालने बॅडमिंटनमध्‍ये चीनचे वर्चस्व संपुष्‍टात आणले आहे. योनेक्स सनराइज इंड‍ियन ओपन बॅडमिंटनच्या उपांत्य फेरीत प्रवेश करताना तिने हा विक्रम नोंदवला आहे. सायनाने शुक्रवारी (ता.27) उपांत्यपूर्व फेरीत इंडोनेशियाची हाना रामधिनीला हरवले. सायनाने सहजरीत्या युईला हरवत फायनलमध्ये प्रवेश केला असून आता तिची गाठ राशनोक इंटानोनशी पडणार आहे.
सायनाने उपांत्यपुर्व सामन्यात इंडोनेशियाची हाना रामाधिनीला 40 मिनिटांमध्‍ये 21-15, 21-12 ने हरवले. पाठोपाठ पाच गुण मिळवताना तिने पहिल्या खेळाची सुरुवात वेगाने केली. परंतु रामाधिनीने 10-10 अशी बरोबरीचे गुण केले. यानंतर सायनाने वेग वाढवला आणि रामाधिनीला कोणतीही संधी न देता आगेकूच केली. यात तिचे गुण वाढत गेले व विजय सहज साध्‍य झाले.