महाराष्ट्रात अकोला सर्वाधिक ४६.४ तर गोंदियाचे ४३.८ अंश सेल्सिअस तापमान

0
30

गोंदिया,दि.दि. २६ः-गेले काही दिवस तापमानात सातत्याने वाढ होत असून, शुक्रवारी (दि. २६) राज्यातील कमाल तापमानाने इतिहास रचला. राज्यात सर्वत्र कमाल आणि किमान तापमानातही चार ते पाच अंशाची वाढ नोंदविण्यात आली. कमाल तापमानाबरोबरच किमान तापमानाचा पारा देखील वीस अंशापुढेच राहणार आहे. त्यामुळे दिवसाबरोबर रात्र देखील उष्म्याचीच असेल.
राज्यात अकोला येथे सर्वाधिक ४६.४ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. येथील किमान तापामानाचा पारा देखील २९.७ अंश सेल्सिअसवर आहे.तर गोंदियाचे तापमान गोंदिया ४३.८ अंश सेल्सिअसवर पोचले आहे. विदर्भातील जवळपास सर्वच जिल्ह्यात तापमान ४५ च्यावर गेले असून, मराठवाडा आणि मध्यमहाराष्ट्रात कमाल तापमानाचा पारा ४३ ते ४४ अंशा दरम्यान आहे. राज्यात सर्वत्र कमाल तापमानाचा पारा बेचाळीस अंश सेल्सिअसच्या वर असल्याची ही दुर्मिळ घटना असल्याचे हवामान विभागाकडून सांगण्यात आले. महाराष्ट्रातील तापमान पुणे ४२.६, लोहगाव ४२.५, अहमदनगर, ४४.९, जळगाव ४४.४, कोल्हापूर ४१, महाबळेश्वर ३६.१, मालेगाव ४३.२, नाशिक ४१.७, सांगली ४३, सातारा ४१.६, सोलापूर ४४.३, उस्मानाबाद ४३.८, औरंगाबाद ४३, परभणी ४५.७, नांदेड ४४.५, बीड ४४.२, अकोला ४६.४, अमरावती ४५.४, बुलडाणा ४३.१, ब्रम्हपुरी ४५.८, चंद्रपूर ४५.६, गोंदिया ४३.८, नागपूर ४५.२, वाशिम ४४.२, वर्धा ४५.७, यवतमाळ ४४.५ अशाप्रमाणे आहे.