जिल्हा हिवताप कार्यालयामार्फत जागतिक हिवताप दिन साजरा

0
20

गडचिरोली दि.२६: ङ्जागतिक हिवताप दिन २५ एप्रिलला जिल्हा हिवताप कार्यालय, गडचिरोली मार्फत साजरा करण्यात आला. या वर्षीच्या जागतिक हिवताप दिनाचे घोषवाक्य ङ्कङ्क हिवतापाला झिरो करु, माझ्यापासून सुरुवात करु ङ्कङ्क असे आहे . हिवताप विषयी जनतेमध्ये जागृती निर्माण होवुन प्रतिबंधात्मक उपाययोजनेच्या अंमलबजावणीसाठी जनतेचा सक्रीय सहभाग प्राप्त करुन घेण्याच्या दृष्टीने नागरीकांपर्यत माहिती पोहोचविण्याचा प्रयत्न करणे, हा या मोहिमेची उद्देशआहे. जनतेमध्ये हिवतापाविषयी जनजागृती व्हावी याकरीता विश्राम भवन , इंदिरा गांधी चौक, गडचिरोली येथून आरोग्य विभागामार्फत भव्य रॅलीचे आयोजन करण्यात आले होते.
या रॅलीला जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. अनिल रुडे, अतिरीक्त जिल्हा शल्य चिकीत्सक, डॉ. किलनाके , सामान्य रुग्णालय गडचिरोली यांनी हिरवी झेंडी दाखवून रॅलीची सुरुवात केली. ही रॅली विश्रामगृह ते त्रीमुर्ती चौक मार्गे आरमोरी असे रोड येवून जिल्हा महिला व बाल रुग्णालय , गडचिरोली येथे सांगता करण्यात आली.
जिल्हा महिला बाल रुग्णालय, गडचिरोली येथे जनतेमध्ये जनजानृती निर्माण होण्याकरीता सदर रुग्णालयाच्या सभागृहामध्ये हिवताप कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यशाळेचे उद्घाटन मान्यवरांच्या हस्ते दिप प्रज्वलीत व रोनॉल्ड रॉस यांच्या प्रतिमेला माल्यार्पण करण्यात आले. या कार्यक्रमाचे अध्यक्ष डॉ. अनिल रुडे, प्रमुख अतिथी म्हणून अतिरीक्त जिल्हा आरोग्य अधिकारी, डॉ. सुनिल मडावी , डॉ. किलनाके मॅडम, डॉ. दिपचंद सोयाम, वैद्यकीय अधिक्षक, डॉ. बागराज धुर्वे निवासी वैद्यकीय अधिकारी, डॉ. कुणाल मोडक, जिल्हा हिवताप अधिकारी, उपस्थित होते.
हिवताप हा गडचिरोली जिल्हयाकरीता अति संवेदनशील आजार असून दरवर्षी मोठया प्रमाणात रुग्ण आढळून येतात, याकरीता वेळीच हिवतापावर उपाययोजना केल्यास किंवा पूर्वतयारी केल्यास हिवतापावर नियंत्रण मिळविता येतो. असे डॉ. मडावी यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले. प्रमुख अतिथी डॉ. बागराज धुर्वे यांनी हिवताप हा डासापासून होणारा आजार आहे. व हा आजार नष्ट होण्याकरीता नागरीकांनी आपला परिसर स्वच्छ ठेवावा, असे आवाहन नागरिकांना केले. कार्यक्रमाचे अध्यक्ष डॉ. रुडे, यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले.
या कार्यक्रमात सन २०१८-१९ मध्ये हिवताप आजाराविषयी उल्लेखनिय काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना मान्यवरांच्या हस्ते प्रशस्तीपत्र देवून सत्कार करण्यात आला.
प्रास्ताविक श्री. ठाकरे, आरोग्य पर्यवेक्षक यांनी केले, प्रास्ताविक भाषण डॉ. कुणाल मोडक, यांनी केले. आभार प्रदर्शन के. एस. राऊत, यांनी केले, या कार्यक्रमाच्या यशस्वीतेकरीता एस. एस. भार्गवे, एस.पी. मौदेकर, डि .के. कुनघाडकर, एस.एस.धारणे, नैताम, राजेश कार्लेकर, निमजे, पवार , समर्थ, श्रीमती देवगडे, श्रीमती कोसनकर व अधिनस्त सर्व हिवताप व हत्तीरोग कर्मचारी यांनी मोलाचे सहकार्य केले.