दहशतवाद्यांच्या हल्ल्यात 3 पोलिस हुतात्मा

0
7

श्रीनगर – जम्मु काश्‍मीरमधील शोपियां जिल्ह्यातील आशिपोरा भागामध्ये आज (सोमवार) लष्करी गणवेशातील दहशतवाद्यांनी केलेल्या हल्ल्यामध्ये तीन पोलिस हुतात्मा झाले.

“आज सकाळी लष्करी गणवेशातील दहशतवाद्यांनी पोलिसांची गाडी थांबवून त्यांना खाली उतरण्यास सांगितले. त्यानंतर त्यांना गोळ्या घालून ठार केले. हे तीनही पोलिस कर्मचारी नि:शस्त्र होते,‘‘ असे एका वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्याने सांगितले. हे पोलिस शेजारील एका गावामधील प्रकरणाचा तपास संपवून परत येत होते. उत्तर काश्‍मीरमधील बारामुल्ला जिल्ह्यामध्येही आज दहशतवाद्यांनी केलेल्या गोळीबारामध्ये एक पोलिस अधिकारी गंभीर जखमी झाला.