श्वेतपत्रिका विधानसभेत सादर

0
7

मुंबई–राज्याच्या गेल्या दहा वर्षांतील आर्थिक स्थितीचा आढावा घेणारी श्वेतपत्रिका शुक्रवारी अर्थराज्यमंत्री दीपक केसरकर यांनी विधानसभेत सादर केली.
अर्थसंकल्पी अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी ही श्वेतपत्रिका का सादर करण्यात आली, असा सवाल यावेळी राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नेते जयंत पाटील यांनी विचारला. गेले पाच आठवडे अर्थसंकल्पी अधिवेशन सुरू आहे. त्यावेळी ही श्वेतपत्रिका का सादर करण्यात आली नाही आणि आज शेवटच्या दिवशी ती का सभागृहात मांडण्यात आली, असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला. श्वेतपत्रिका आधी सादर करण्यात आली असती, तर त्यावर सभागृहात चर्चा करता आली असती, असेही त्यांनी सांगितले. त्याला उत्तर देताना केसरकर म्हणाले, मंत्रिमंडळाच्या गुरुवारी झालेल्या बैठकीत ही श्वेतपत्रिका सादर करण्याचा निर्णय घेण्यात आल्यामुळे ती सभागृहात मांडण्यात आली आहे. सदस्यांना यातील काही मुद्द्यांवर माहिती हवी असल्यास ती देण्यास आपण तयार आहोत, असेही त्यांनी यावेळी सांगितले.