राज्यातील 37 आयपीएस अधिकाऱ्यांच्या बदल्या,

0
12

मुंबई : राज्यातील 37 वरिष्ठ आयपीएस अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत. जे अधिकारी सध्या आता निवडणुकीच्या कामांमध्ये व्यस्त आहेत, त्यांना निवडणुकीनंतर नव्या पदाची जबाबदारी सोपवली जाणार आहे. मात्र राज्यातील कोणत्याही निवडणुकीच्या कामात व्यस्त नसलेल्यांना तातडीने नव्या पदाची जबाबदारी सोपवली जाणार आहे.

वरिष्ठ आयपीएस अधिकाऱ्यांच्या बदल्यांमध्ये सर्वात महत्त्वाची बदली मानली जाते आहे ती नागपूरच्या पोलिस आयुक्तांची. गेल्या काही दिवसांपासून नागपुरातील गुंडगिरी सातत्याने चव्हाट्यावर येते आहे. नागपुरात गुंडांची दहशत वाढतना दिसत आहे. नागपूरकरांमध्ये प्रचंड संताप आहे. त्यामुळेच नागपूर पोलिस आयुक्त के. के. पाठक यांची उचलबांगडी केली गेली आहे. आता एस. पी. यादव हे नागपूरचे नवे पोलिस आयुक्त असणार आहेत.तर एटीएस प्रमुख हिमांशू रॉय यांची एटीएस प्रमुख पदावरुन उचलबांगडी करण्यात आली आहे. ते आता पोलिस हाऊसिंग अँड वेलफेअर कॉर्पोरेशनचे अतिरिक्त महासंचालक असणार आहेत.

आयपीएस अधिकारी (सध्याचं पोस्टिंग) नवी नियुक्ती

1. सतीश चंद्र माथूर (पोलिस आयुक्त पुणे) – महासंचालक, कायदे आणि तंत्रज्ञान, मुंबई (पदोन्नती)
2. एस. पी. यादव (अति. महासंचालक, CID) – पोलिस आयुक्त, नागपूर
3. के. के. पाठक (पोलिस आयुक्त, नागपूर) – पोलिस आयुक्त, पुणे
4. व्ही. डी. मिश्रा (अति. महासंचालक, PCR) – अति. महासंचालक (आस्थापना)
5. डी. कणकरत्नम (अति. महासंचालक, आस्थापना) – अति. महासंचालक (रेल्वे)
6. संजय बर्वे (अति. महासंचालक (रेल्वे) – अति. महासंचालक (ACB विभाग)
7. संदीप बिश्नोई (मुख्य दक्षता अधिकारी, एसटी) – अति. महासंचालक, SRPF (पदोन्नती)
8. विनित अग्रवाल (विशेष गृहसचिव) – मुख्य दक्षता अधिकारी, एसटी
9. विवेक फणसळकर (सहआयुक्त, प्रशासन) – एटीएस प्रमुख
10. हिमांशू रॉय (एटीएस प्रमुख) – अति. महासंचालक, पोलिस गृहनिर्माण आणि कल्याण
11. बी. के. उपाध्याय (सहआयुक्त, वाहतूक) – विशेष प्रधान गृहसचिव (पदोन्नती)
12. संजय कुमार (सहआयुक्त, पुणे) – अति. महासंचालक, CID (पदोन्नती)
13. राजेंद्र सिंह (पोलिस आयुक्त, औरंगाबाद) – अति. महासंचालक, नियोजन आणि समन्वय (पदोन्नती)
14. हेमंत नागराळे (अति. महासंचालक, नियोजन आणि समन्वय) – अति. महासंचालक, म्हाडा
15. प्रज्ञा सरवदे (विशेष पो. महानिरीक्षक, दक्षता अधिकारी, सिडको)- अति.महासंचालक, सिडको (पदोन्नती)
16. विठ्ठल जाधव (प्रशासकीय संचालक) – तुरुंग महानिरीक्षक, नागपूर
17. शशिकांत शिंदे (तुरुंग महानिरीक्षक, नागपूर) – संचालक, महाराष्ट्र सुरक्षा महामंडळ
18. मधूकर पांडे (विशेष महानिरीक्षक, प्रशिक्षण) – पोलिस आयुक्त, रेल्वे
19. रविंद्र सिंघल (पोलिस आयुक्त, रेल्वे) – विशेष महानिरीक्षक, प्रशिक्षण
20. कुलवंतकुमार सरंगल (नियुक्तीच्या प्रतिक्षेत) – विशेष महानिरीक्षक
21. प्रभातकुमार (विशेष महानिरीक्षक) – विशेष महानिरीक्षक, कायदा-व्यवस्था
22. देवेन भारती (विशेष महानिरीक्षक, कायदा आणि सुव्यवस्था) – सहआयुक्त, कायदा-सुव्यवस्था, मुंबई
23. धनंजय कमलाकर (सहआयुक्त, कायदा-सुव्यवस्था, मुंबई) – सहआयुक्त, आर्थिक गुन्हे
24. राजवर्धन (अति. पोलिस आयुक्त, आर्थिक गुन्हे) – सहआयुक्त, नागपूर (पदोन्नती)
25. मिलिंद भारंबे (अति. पोलिस आयुक्त) – वाहतूक सहआयुक्त, मुंबई
26. विश्वास नांगरे-पाटील (उपमहानिरीक्षक, ACB) – विशेष महानिरीक्षक (पदोन्नती)
27. सुरेश मेखला (पोलिस आयुक्त, अमरावती) – विशेष महानिरीक्षक, SRPF (पदोन्नती)
28. अनुपकुमार सिंह (सहआयुक्त, नागपूर) – सहआयुक्त, प्रशासन, मुंबई
29. सुनील रामानंद (विशेष महानिरीक्षक, SRPF) – सहआयुक्त, पुणे
30. रितेश कुमार (विशेष महानिरीक्षक, कोल्हापूर) – विशेष महानिरीक्षक, सीआयडी, पुणे
31. संजय वर्मा (नियुक्तीच्या प्रतिक्षेत) – विशेष महानिरीक्षक, कोल्हापूर
32. जयजित सिंह (विशेष महानिरीक्षक, VIP सुरक्षा) – विशेष महानिरीक्षक, नाशिक
33. प्रवीण साळुंखे (विशेष महानिरीक्षक, नाशिक) – विशेष महानिरीक्षक, सागरी सुरक्षा
34. प्रशांत बुरुडे (विशेष महानिरीक्षक, सागरी सुरक्षा) – विशेष महानिरीक्षक, कोकण
35. अमिताभ गुप्ता (विशेष महानिरीक्षक, कोकण) – विशेष महानिरीक्षक, VIP सुरक्षा
36. बिपीनकुमार सिंह (विशेष महानिरीक्षक, तुरुंग) – विशेष महानिरीक्षक, नांदेड
37. दीपक पांडे (अति. आयुक्त नागपूर, गुन्हे) – विशेष महानिरीक्षक, मानवाधिकार आयोग