पित्याकडून दोन मुलींची निर्घुण हत्या

0
9

चंद्रपूर – चंद्रपूर जिल्ह्यातील ब्रम्हपुरी मधील मालडोंगरी येथे एका पित्याने आपल्या दोन लहान मुलींची हत्या केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे.
भावना झरकर (११)आणि जागृती झरकर (९)अशी या मृत मुलींची नावे आहेत.
आरोपी पित्याने या दोनही मुलींना पाण्यात बुडवून त्यांची हत्या केली आणि त्यानंतर या दोघींचे मृतदेह विहिरीत फेकून दिले.
याप्रकरणी आरोपी वडील तामदेव झरकर याला पोलिसांनी अटक केली आहे. या दोनही मुलींच्या हत्येमागचे कारण समजू शकलेले नाही.