शासकीय सेवा मिळणार ठराविक कालावधीत, सेवा हमी कायदा लागू

0
13

वृत्तसंस्था
मुंबई- सेवा हमी कायद्याच्या विधेयकावर राज्यपाल विद्यासागर राव यांनी आज स्वाक्षरी केली. आजपासून हा कायदा राज्यसभरात लागू झाला आहे. यात शासकीय सेवा जनतेला मिळण्यासाठी एक ठराविक कालावधी निर्धारित करण्यात आला आहे. त्याला विलंब झाल्यास दंडाची तरतुदही यात करण्यात आली आहे.
या विधेयकात सध्या 160 सेवांचा समावेश करण्यात आला आहे. शासकीय सेवा एका ठराविक कालावधीत जनतेला मिळाव्यात यासाठी हे विधेयक आणण्यात आले होते. त्याचा वटहुकूमही काढण्यात आला होता. त्यामुळे एखादे काम लालफितीत अडकल्याचे यापूढे दिसणार नाही. शासकीय कामकाजाचा वेग वाढेल, असे सांगितले जात आहे.
एखादी शासकीय सेवा निर्धारित वेळेत मिळाली नाही तर संबंधित अधिकारी किंवा कार्यालयाविरुद्ध तक्रार दाखल करण्याची तरतुद या विधेयकात आहे. तक्रार खरी असल्याचे सिद्ध झाले तर अधिकारी किंवा कार्यालयावर कारवाई करण्याची तरतुद यात आहे.