आमदार अग्रवाल लोकलेखा समिती अध्यक्षपदी

0
18

गोंदिया,दि.11-गोंदिया विधानसभा मतदारसंघाचे आमदार गोपालदास अग्रवाल यांची महाराष्ट्र विधानमडळाच्या लोकलेखा समिती अध्यक्षपदी निवड झाली आहे.लोकलेखा समितीचे अध्ङ्मक्षपद हे विरोधी पक्षाकडे असते.कॅबीनेट दर्जाचे पद असून काँग्रेसचे वरिष्ठ आमदार अग्रवाल यांची अध्ङ्मक्षपदी निवड महाराष्ट्र सरकारच्ङ्मा विधानमंडळ सचिवालयाने केली आहे.गोंदिया जिल्ह्याला लोकलेखा समितीचे दुसर्दा अध्यक्षपद मिळाले आहे.यापूर्वी माजी आमदार डॉ.खुशाल बोपचे यांना या समितीचे अध्यक्षपद मिळाले होते.आ.अग्रवाल यांची काँग्रेसच्या काळात मंत्री होण्याची इच्छा अपुर्ण राहिली होती.मात्र विरोधी पक्षात येताच कॅबीनेट दर्जा असलेले आणि सर्वात महत्वाच्या समितीचे अध्यक्षपद मिळाल्याने अग्रवालांना अखेर लाल दिवा मिळाल्याने त्यांच्या कार्यकत्यार्ंना उत्साह प्रचंड उसळून वाहत आहे.या माध्यमातून का होईना अग्रवालांची लाल दिव्याची इच्छा पुर्ण झाली आहे.
त्त्याच बरोबर विधान मंडळाच्या भटक्या विमुक्त जाती जमाती समितीवर तिरोड्याच आमदार विजय रहागडाले तर अनुसूचित जमाती कल्याण समितीवर आमगाव देवरीचे आमदार संजय पुराम यांची निवड झाली आहे.