हिंगोलीत भीषण आगीत दुकाने खाक

0
10

हिंगोली दि १९- शहरात आज (मंगळवार) पहाटे दुकानांना आग लागली. पहाटे साडेचारच्या सुमारास ही भीषण दुर्घटना घडल्याचे लक्षात येताच एकच धावपळ झाली.
मिळालेल्या माहितीनुसार, हिंगोली नगरपालिकेचा पाण्याचा टँकर आणि कर्मचारी, नागरिक मदतीसाठी धावले आणि आगीवर नियंत्रण मिळविण्यात आले. आग लागलेल्या दुकानांत एक तेलाचे दुकानही असून सुमारे सात दुकानांचे यात मोठे नुकसान झाल्याची प्राथमिक माहिती आहे. आगीचे कारण लगेचच कळू शकले नाही.