एम्स संदर्भात आज बैठक

0
13

नागपूर दि १९: मिहानमध्ये अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्था (एम्स) उभी राहणार यावर शिक्कामोर्तब झाले आहे. मात्र प्रस्तावित १५० एकरच्या जागेला घेऊन शंका उपस्थित केली जात आहे. या अनुषंगाने ‘एम्स’च्या उभारणीला घेऊन १९ मे रोजी होत असलेल्या मुंबई येथील बैठकीला महत्त्वपूर्ण मानले जात आहे. ही बैठक वैद्यकीय शिक्षण व संशोधन संचालनालयाने आयोजित केली आहे.

केंद्र शासनाच्या आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयातर्फे चार सदस्यांच्या पथकाने मिहानच्या या जागेला पसंती दिली होती. तेव्हा त्यांनी सलग २०० एकर जागेची गरज असल्याचे सांगितले होते. एम्सचा पसारा मोठा आहे. १२०० खाटा, १४०० डॉक्टरांसह वैद्यकीय क्षेत्रातील सुपर स्पेशालिटी अभ्यासक्र म, रु ग्णसेवेच्या अत्याधुनिक सोयी आणि संशोधनाचे विभाग, शिक्षक आणि विद्यार्थ्यांचे निवास ठिकाण राहणार असल्याने १५० एकरची जागा कमी पडण्याची शक्यता वर्तविली जात आहे.
सूत्राने दिलेल्या माहितीनुसार दोन कोटीच्या या प्रकल्पाला येत्या दोन महिन्यात सुरुवात होण्याची शक्यता आहे. असे झाल्या येत्या अडीच-तीन वर्षात एम्स रुग्णसेवेत असेल. याचा सर्वात जास्त फायदा मध्यभारतातील रुग्णांना होईल.