भाजपवाल्यानो वर्ष लोटले; कुठे गेले अच्छे दिन-खा.पटेल

0
16

राष्ट्रवादीच्या मोच्र्यात भाजप सरकारविरोधी जनाक्रोश
गोंदिया ता.२१-:-गेल्या वर्षभरापूर्वी अच्छे दिन चे गाजर दाखवून जातीयतेच्या नावावर निवडणूक जिंकणाèया केंद्र व राज्यातील भाजपच्या सरकारने धान उत्पादक शेतकèयांची व ओबीसी विद्याथ्र्यांची थट्टा केली आहे.तसेच जनतेला महागाईच्या गर्तेत लोटण्याचे काम केल्याचा घणाघाती आरोप राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते व खासदार प्रफुल पटेल यांनी केला.केंद्रातील भाजप सरकारला वर्ष झाले असून आपण सरकार वर्षभर काय करते याचीच वाट बघत गप्प बसलो होतो.अच्छे दिनचे गाजर दाखवून सत्ता मिळविणाèया भाजपवाल्यांनो कुठे आहेत अच्छे दिन ते आम्हाला दाखवा असा घणाघात करून केंद्रातील व राज्यातील भाजप सरकारच्या कामकाजाचे वाभाडे मोच्र्याला संबोधित करतांना काढले.तसेच राष्ट्रवादी काँग्रेसच्या भव्य मोच्र्याला सामोरे जाऊन निवेदन स्वीकारण्याची हिमंत नसलेले जिल्हाधिकारी मोर्चा निघण्याआधीच मुंबईला पळाले.तसेच राज्यातील मुबंईतील सरकार चालविणारे सुध्दा पळपुटे असल्याचे पटेल म्हणाले.
केंद्रात व राज्यात सत्तेत येण्यासाठी निवडणुकीच्या प्रचारात धानाला अधिक हमीभाव देऊ,सत्तेत येताच प्रत्येक नागरिकाच्या बँक खात्यात १५ लाख रुपये देऊ,ओबीसीच्या शिष्यवृत्तीचा प्रश्न मार्गी लावू आदी आश्वासने भाजपने दिली होती. त्यापैकी एकही आश्वासन गेल्या वर्षभरात पूर्ण केलेले नाही.१०० दिवसात महागाई स्वस्त करू म्हणणारेच आता आम्हाला अधिक वेळ द्या असे सांगत फिरत आहेत.आमच्या देशातील शेतकरी कर्जापायी व नापिकी,नुकसानीमुळे आत्महत्या करीत आहे.परंतु आमचे पंतप्रधान त्यांना मदत करण्याचे सोडून विदेशात पैशाची खैरात वाटू लागल्याचेही म्हणाले.ओबीसीच्या नावावर निवडणुकीत प्रचार करून qजकणाèयाची कुठे गेली ओबीसी छावा संग्राम परिषद असा टोमणा हाणत केंद्रातील सरकार ओबीसींच्या खच्चीकरणासाठी ओबीसींना तीन वर्गात मोडण्याचा प्रयत्न करीत असल्याचा आरोपही केला. जो धान परदेशात निर्यात व्हायचा व धानाला भाव मिळायचा ती निर्यातच थांबविल्याने आज शेतकèयाच्या धान पडक्या दरात व्यापारी वर्गाने खरेदी केला.गेल्या काही दिवसापूर्वी शेतकèयाच्या धानाला प्रोत्साहन राशीची घोषणा करण्यात आली,परंतु ती प्रोत्साहन राशी कुठल्या शेतकèयाला मिळणार त्याचा कुठेच उल्लेख नसून अर्थसंकल्पात निधीची तरतूद नसल्याने केवळ जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत संभाव्य पराभव बघून भारतीय जनता पक्षाने शेतकèयांच्या डोळ्यात धूळफेक करण्यासाठीच प्रोत्साहन मदतीची घोषणा केल्याचा आरोपही केला.
यापूर्वी सुभाष शाळेच्या मैदानातून राष्ट्रवादी काँग्रेसच्या मोच्र्याची सुरवात करण्यात आली.हा मोर्चा गांधी चौक,गोरेलाल चौक मार्ग नेहरू चौक होत उपविभागीय कार्यालयासमोर पोचला.या ठिकाणी मोच्र्याचे सभेत रूपांतर करण्यात आले.मोच्र्याचे नेतृत्व खासदार प्रफुल पटेल,जिल्हा परिषद अध्यक्ष विजय शिवणकर,आमदार राजेंद्र जैन,माजी आमदार दिलीप बनसोड,जिल्हाध्यक्ष विनोद हरिणखेडे,राजलक्ष्मी तुरकर,केतन तुरकर,बबलू कटरे,सुशील रहांगडाले,दामोदर अग्रवाल,केवल बघेले,गंगाधर परशुरामकर,पंचम बिसेन,अविनाश काशीवार,तुंडीलाल कटरे,प्रभाकर दोनोडे,अशोक गुप्ता,लता रहागंडाले,रमेश ताराम,दुर्गा तिराले,शिव शर्मा,चुन्नीलाल बेंदरे,जितेश टेंभरे,छोटू पटले,कुंदन कटारे,जगदीश बहेकार,विनोद पटले,राजू एन जैन,महेश जैन,तुकाराम बोहरे,विजय राणे,उध्वव मेहंदळे,भाष्कर रहागंडाले, आदींनी केले.
पटेल पुढे म्हणाले की शेतकèयाचा धान निर्यात होत नसून सध्याचा घडीला आपले पंतप्रधान मोदीच निर्यात होत आहेत.पेट्रोल डिझेलची दरवाढ करून सरकारने १ लाख कोटीचा शुद्ध नफा कमविला आहे.तर तिरोडा येथे अदानीचा वीज प्रकल्प जिल्ह्यात २४ तास वीज आणि स्वस्त वीज मिळावी यासाठी सुरू करण्यात आला होता,परंतु आता अदानीची वीज कुठे गेली कुणास ठाऊक.उलट विजेचे येणारे बिल हे कंबरडे मोडणारे असल्याचे म्हणाले.ओबीसी विद्याथ्र्यांच्या शिष्यवृत्तीची रक्कम अद्यापही दिलेली नाही.त्यातच आघाडीच्या तत्कालीन केंद्र सरकारने ९ लाख क्रिमिलेयरची मर्यादा ठेवलेली असताना राज्यातील भाजप सरकार मात्र साडे चार लाख मर्यादा करून ओबीसी विद्याथ्र्यावर अन्याय करीत असल्याचा आरोप केला.विजय शिवणकर यांनी भाजप ही सत्तापिपासू असून त्यांना सामान्य जनतेशी काहीही देण घेण नाही.सत्ता घेण्यासाठी खोटे आश्वासन देऊन जनतेची फसवणूक केली आहे अशा भाजपला जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत धडा शिकविण्याचे आवाहन केले.यावेळी आमदार राजेंद्र जैन,दिलीप बनसोड,नरेश माहेश्वरी,बबलू कटरे आदींनी विचार व्यक्त केले.सभेचे संचालन गंगाधर परशुरामकर यांनी केले.
विशेष म्हणजे मोच्र्याचे निवेदन स्वीकारण्यासाठी जिल्हाधिकारी विजय सूर्यवंशी यांना आधीच कल्पना देण्यात आली होती.परंतु त्यांनी निवेदन स्वीकारण्याची हिमंत न दाखविता मुंबईला पळ काढला तसेच राज्याचे मुख्यमंत्री सुध्दा विकासकामाच्या बाबतीत पळपुटे असल्याचा टोला प्रफुल पटेल यांनी हाणला.जोपर्यंत अधिकारी निवेदन स्वीकारायला येणार नाही,तोपर्यंत हलणार नाही अशा इशारा दिला.त्यानंतर उपविभागीय अधिकारी के.एन.के.राव व तहसीलदार संजय पवार यांनी मोच्र्यास्थळी जाऊन निवेदन स्वीकारले.
पोलिसांनी मोच्र्याकèयावर तसेच राष्ट्रवादीच्या कार्यकत्र्यावर दबावतंत्र व बळाचा गैरवापर करून धमकावण्याचा प्रयत्न करू नये.मी त्यांच्या पाठीशी आहे.राज्यात व केंद्रात सत्ता नसली तरी प्रफुल पटेलांचे तेवढे वजन आहे हे पोलीस अधिकाèयांनी लक्षात ठेवावे असा सल्ला सुध्दा दिला.