छत्तीसगडमध्ये चकमकीत महिला नक्षलवादी ठार

0
14

रायपूर (छत्तीसगड) दि.२– बिजापूर जिल्ह्यात सुरक्षा दलाच्या जवानांनी केलेल्या कारवाईत महिला नक्षलवादी ठार झाली आहे, अशी माहिती पोलिसांनी आज (मंगळवार) दिली.

सुरक्षा दलाचे जवान व पोलिसांनी संयुक्तरीत्या नक्षलवाद्यांविरोधात आज पहाटे शोध मोहिम सुरू केली होती. यावेळी नक्षलवादी व जवानांमध्ये जोरदार चकमक झाली. यावेळी झालेल्या चकमकीत महिला नक्षलवादी जागीच ठार झाली. घटनास्थळावरून शस्त्रास्त्रे जप्त करण्यात आली आहेत, अशी माहिती वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांनी दिली.