बंधाèयावरील स्वाक्षरीच्या समंत्तीमुळे अविश्वासाची हवाच गोल

0
15

गोंदिया दि.३-राज्यात जेव्हापासून भारतीय जनता पक्ष सत्तेत आले,तेव्हापासूनच जिल्हा परिषदेच्या विकासकांमाना खीळ बसण्यास सुरवात झाली.त्यातही जिल्हा परिषदेमध्ये भारतीय जनता पक्षाची सत्ता असतानाही सीईओपासून कुठलाही अधिकारी त्यांची एैकत नसल्याने त्यांच्यावर अविश्वास प्रस्ताव आणण्यासाठी दबाव घालणाèयात भाजपचे सभापती मोरेश्वर कटरे,मदन पटले,सविता पुराम,कुसन घासले आणि प्रकाश गहाणे यांच्यासोबतच त्यांच्या जिल्हा परिषद सदस्यांचा समावेश होता.विशेष म्हणजे जि.प.अध्यक्ष विजय शिवणकर अविश्वासाच्या बाजुने नसतानाही भाजपच्या जि.प.सदस्यांना मिळालेले बंधारे बांधकामाचे कंत्राट आपल्या जवळच्या कंत्राटदार कार्यकत्र्याला ५ ते १० टक्केची रक्कम घेऊन विकल्याची चर्चा होती.ती रक्कम आधीच घेतल्यानंतर अधिकाèयांनी विविध कारणे दाखवीत बंधारे मंजूर करण्यास अडथळा सुरू केला तो सुध्दा राज्यातील भाजपच्या नेत्यांच्या ईशारावरुन हे सुध्दा तेवढेच खरे आहे.पालकमंत्री हा जिल्ह्याच्या विकासाचा मुख्य द्वारपाल असतो परंतु विद्ममान पालकमंत्र्यानी तर कुणी जसे सांगतील तसेच काम करण्यास सुरवात केल्यामुळेच जिल्हा परिषदेत जे अधिकारी सध्या आलेत ते काही कामाचेच नव्हे तर भाजपच्याच सदस्यांचे व पदाधिकाèयांचे एैकत नाही.विशेष म्हणजे भाजपच्या सर्व आजी माजी आमदारांनी व पालकमंत्र्यानी जि.प.अध्यक्ष विजय शिवणकर यांना कोंडीत पकडण्यासाठी ही खेळी खेळली यात दुमतच राहिले नाही.परंतु त्या खेळीत स्वतच भाजप फसली.जो बंधारे विषय ऐवढे दिवस ताटकळत ठेवण्यास पालकमंत्री आणि भाजपचे काही नेते जबाबदार आहेत त्यांना जेव्हा भाजपच्याच सदस्यांनी अविश्वास प्रस्ताव ६ तारखेला ठेवला हे लक्षात आल्यावर आपणच आणलेला बाहुला अधिकारी अविश्वासाच्या माध्यमातून परत जाईल आणि शिवणकरांची पुंगी वाजण्याएैवजी आपलीच पुंगी वाजणार हे लक्षात आल्यावर १ जून रोजी विश्रामगृहात जि.प.सदस्यांची बैठक बोलावण्यात आली.या बैठकीत सुरवातीला तर पक्षाच्या विविध विषयावर चर्चा करीत जे विद्यमान सदस्यांचे मतदारसंघ आरक्षित झाले त्यांच्यावर सरळ अविश्वास दाखवीत तुम्ही पक्षाचे काम जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत करणार की नाही,अशा प्रश्न विचारून भाजपच्या लोकप्रतिनिधींनी त्या सदस्यावर पक्षाचाच नव्हे तर आमचाही किती विश्वास आहे,हे दाखवून दिले.त्यावर सर्वच सदस्यांनी आम्ही पक्षासोबतच असल्याची ग्वाहीही दिली.त्या चर्चेनंतर जिल्हा परिषदेतील विविध विकास कामात खोळंबा येत असल्याचा विषय आला.त्या विषयावर चर्चा करण्यात आली शासन आपले आहे,अधिकारी आपण आणलेत अविश्वास कशाला अशाही चर्चा रंगल्या आणि जिल्ह्याचे पालकमंत्री व सामाजिक न्याय मंत्री यांच्या नेतृत्वात विद्यमान आमदार आणि माजी काही आमदारांच्या उपस्थितीत जिल्हाधिकारी यांच्या कक्षात एक बैठक घेण्यात आली.ती बैठक रात्री ८ वाजेपर्यंत चालली त्या बैठकीत सीईओसह जि.प.च्या अधिकाèयांना बोलावण्यात आले.आणि सीईओला पालकमंत्री व इतर लोकप्रतिनिधींनी जिल्हाधिकारी समक्ष बंधारे फाईलवर स्वाक्षरी करण्यासोबतच सर्व विकास कामे मंजूर करा जिल्हा परिषदेच्या निवडणुका आहेत असे सांगण्यात आले.६ तारखेच्या आधी स्वाक्षरी करून सर्व रखडेलेले विषय मार्गी लागले तर तुमच्यावर अविश्वास प्रस्ताव येणार नाही आणि स्थायी व सर्वसाधारण सभेत ठराव झाले असले तरी तुमच्या विरोधात मंत्रालयात तक्रार होणार नाही याची हमी सुध्दा देण्यात आल्याची चर्चा आहे.त्यामुळे भाजपने निव्वळ बंधारे व बांधकाम विभागाच्या कामासाठी अधिकाèयाना अविश्वासाच्या नावावर ब्लकमेल करण्याचे काम गेल्या काही महिन्यात केल्याची पितळ आता उघडे झाल्याशिवाय राहणार नाही.