मेघालयमध्ये चकमकीत दोन दहशतवादी ठार

0
10

वृत्तसंस्था
शिलाँग दि.२८- मेघालयाच्या उत्तर गारो हिल्स जिल्ह्यात रविवारी झालेल्या चकमकीत दोन संशयित दहशतवादी ठार झाले.या भागात दहशतवादी घुसल्याची माहिती गुप्तचर यंत्रणेने दिली होती. या माहितीनुसार रविवारी पोलीसांचे विशेष पथक आणि आसामच्या १९ डोग्रा रेजिमेंटच्या जवानांनी संयुक्त कारवाई केली.
पहाटे ४.४०च्या सुमारास लपून बसलेल्या दहशतवाद्यांनी सुरक्षारक्षकांवर जोरदार गोळीबार केला. दहशतवाद्यांच्या गोळीबारास दिलेल्या प्रत्युत्तरात दोन दहशतवाद्यांना कंठस्नान घालण्यात यश आले.
दरम्यान, ठार झालेल्या दहशतवाद्यांची ओळख अद्याप पटलेली नाही. घटनास्थळावरुन नऊ मिमीचे पिस्तुल, ७.६५ मिमीचे पिस्तुल, मोबाईल फोन, तीन सिम कार्ड, औषधे आणि कपडे असलेली बॅग हस्तगत करण्यात आली आहे.