जहाल नक्षली सुनील हिडामी यास अटक

0
11

गोंदिया, दि.१०: जहाल नक्षली व चातगाव दलमचा सदस्य सुनील हिडामी(२५) यास केंद्रीय राखीव दलाच्या जवानांनी आज गडचिरोली जिल्ह्यातील मरकेगाव येथून अटक केली.
मूळचा सावरगाव पोलिस मदत केंद्रांतर्गत मरकेगाव येथील रहिवासी असलेला सुनील हिडामी २०११ पासून नक्षल्यांच्या चातगाव दलमचा सदस्य आहे. २०११ मध्ये तुर्रेकसा येथे झालेली चकमक, रामचंद्र बैरवार यांची हत्या, २०१२ मधील काकडयेली येथील चकमक, २०१४ मध्ये जितेंद्रशहा मडावी यांची हत्या, कटेझरी, देवसूर व मगदंडटोला येथील चकमकीत त्याचा सहभाग होता. आज नक्षलविरोधी अभियान राबवीत असताना केंद्रीय राखीव दलाच्या जवानांनी सुनीलला अटक केली. जून महिन्यात चातगाव दलम कमांडर विजय दुगा याने पत्नी राधासह पोलिसांपुढे आत्मसमर्पण केले होते. त्यानंतर आता चातगाव दलम सदस्य सुनील हिडामी यास अटक करण्यात आल्याने नक्षल चळवळीला मोठा हादरा बसला आहे.