कन्याकुमारी काशी साप्ताहिक रेल्वे गाडीचे गोंदिया स्थानकावर उत्साहात स्वागत

0
30

गोंदिया:पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेतून साकारलेल्या आणि एक भारत श्रेष्ठ भारत योजनेअंतर्गत सुरू करण्यात आलेल्या कन्याकुमारी काशी कन्याकुमारी या काशी तामिळ संगम एक्सप्रेस रेल्वे गाडीचे आगमन आज गोंदिया रेल्वे स्थानकावर झाले. यावेळी गाडीचे ढोल ताशाच्या गजरात स्वागत करण्यात आले.
एक भारत श्रेष्ठ भारत योजनेअंतर्गत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भारताचे वैविध्य कळावी या हेतूने सुरू केलेल्या विविध उपक्रमांतर्गत काशी तामिळ संगम एक्सप्रेस म्हणजे कन्याकुमारी काशी कन्याकुमारी या रेल्वेगाडीचा शुभारंभ 17 डिसेंबर रोजी हिरवी झेंडी दाखवून केला. या गाडीला गोंदिया आणि बालाघाट या रेल्वे स्थानकावर थांबा देण्यात आला आहे. सकाळी 7.35 वाजता या गाडीचे आगमन  झाले. खासदार सुनील मेंढे यांचे प्रतिनिधी म्हणून गजेंद्र फुंडे  यांनी गाडीचे चालक आणि सहचालक यांना पुष्पगुच्छ देत त्यांचे स्वागत केले. यावेळी ढोल ताशाचा गजर करण्यात आला. गोपाल अग्रवाल, जसपाल सिंग चावला, विनोद चांदवानी, प्रशांत बुरकुटे, धुलीचंद बुधे, महेंद्र देशमुख,चंद्रभान तरोने,पुरुषोत्तम ठाकरे,राकेश अग्रवाल राजकुमार कुथे, दीपक कदम, अमित झा, चंद्रभान तरोणे यांच्यासह अनेक मान्यवर यावेळी उपस्थित होते. ही गाडी साप्ताहिक असून आठवड्यातून एकदा गोंदिया येथे दाखल होणार आहे. बनारस कडून कन्याकुमारी कडे जाणारी गाडी प्रत्येक सोमवारी सकाळी 7.55 वाजता तर कन्याकुमारी कडून बनारसला जाणारी गाडी दर शुक्रवारी सकाळी 7.40 वाजता गोंदिया रेल्वे स्थानकावर येणार आहे. या गाडीमुळे कन्याकुमारी आणि काशीला जाणाऱ्या प्रवाशांची मोठी सोय होणार असून यासाठी स्वतः खासदार सुनील मेंढे यांनी देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांचे आभार मानले आहे. प्रवासशांनी या सुविधेचा लाभ घ्यावा असे आवाहन त्यांनी केले आहे.