२४८ रुग्ण कोरोनामुक्त;नवे १०० पॉझिटिव्ह रुग्ण आढळले

0
803

गोंदिया,दि.०१(जिमाका) जिल्ह्यातील विषाणू चाचणी प्रयोगशाळेतून प्राप्त अहवालानुसार आज २४८ रुग्णांनी औषधोपचारातून कोरोनावर मात केली. तर नविन १०० पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले.
जिल्ह्यात आज १०० कोरोना बाधित रुग्ण आढळून आले आहे. यामध्ये तालुकानिहाय पुढील प्रमाणे. गोंदिया तालुका-५४, तिरोडा तालुका-९, गोरेगाव तालुका-२, आमगाव तालुका-६, सालेकसा तालुका-१४, देवरी तालुका-१, सडक/अर्जुनी तालुका-६ व अर्जुनी/मोरगाव तालुक्यातील आठ रुग्णांचा समावेश आहे.

जिल्ह्यात पॉझिटिव्ह आढळलेले आतापर्यंतचे रुग्ण तालुकानिहाय पुढीलप्रमाणे. गोंदिया तालुका-४२०५, तिरोडा तालुका-९८१, गोरेगाव तालुका-३१५, आमगाव तालुका- ४५५, सालेकसा तालुका -३३७, देवरी तालुका-२७३, सडक/अर्जुनी तालुका-२४४, अर्जुनी/मोरगाव तालुका-२७९ आणि बाहेर जिल्हा व इतर राज्यात आढळलेले-८९ रुग्ण आहे. असे एकूण ७१७८ रुग्ण बाधित आढळले आहे.

आज ज्या २४८ रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. त्यामध्ये गोंदिया तालुका-१०३, तिरोडा तालुका-४३, गोरेगाव तालुका-१०, आमगाव तालुका-२१, सालेकसा तालुका-२, देवरी तालुका-५, सडक/अर्जुनी तालुका-१, अर्जुनी/मोरगाव तालुका-१२ व इतर राज्य/जिल्ह्यातील ५१ रुग्णांचा समावेश आहे.

आतापर्यंत ५१५२ रुग्णांनी मात केली आहे. यामध्ये गोंदिया तालुका-३१४१, तिरोडा तालुका-६७५, गोरेगाव तालुका-२१०, आमगाव तालुका-३१२, सालेकसा तालुका-१५६, देवरी तालुका-१७२, सडक/अर्जुनी तालुका-१८७, अर्जुनी/मोरगाव तालुका-२३१ आणि इतर-६८ रुग्णांचा समावेश आहे.

कोरोना क्रियाशील रुग्णांची संख्या १९२६ झाली आहे. तालुकानिहाय पुढीलप्रमाणे आहे. गोंदिया तालुका -१००५, तिरोडा तालुका- २९२, गोरेगाव तालुका-१०२, आमगाव तालुका-१३७, सालेकसा तालुका- १७९, देवरी तालुका-९९, सडक/अर्जुनी तालुका- ५४, अर्जुनी/मोरगाव तालुका-४६ आणि इतर-१२ असे एकूण १९२६ रुग्ण कोरोना क्रियाशील आहेत.

क्रियाशील रुग्णांपैकी ५६३ रुग्ण घरीच अलगीकरणात आहे. तालुकानिहाय पुढीलप्रमाणे गोंदिया तालुका-२३२, तिरोडा तालुका-८१, गोरेगाव तालुका-४६, आमगाव तालुका-२७, सालेकसा तालुका-८०, देवरी तालुका-५६, सडक/अर्जुनी तालुका-०४, अर्जुनी/मोरगाव तालुका-३७ व इतर ०० असे एकूण ५६३ क्रियाशील रुग्ण घरीच अलगिकरणात आहे.

आतापर्यंत १०० कोरोनाबाधित रुग्णांचा मृत्यू झाला. यामध्ये गोंदिया तालुका-५९, तिरोडा तालुका-१४, गोरेगाव तालुका-३, आमगाव तालुका-६, सालेकसा तालुका-२, देवरी तालुका-२, सडक/अर्जुनी तालुका-३, अर्जुनी/मोरगाव तालुका-२ व इतर ठिकाणच्या नऊ रुग्णांचा समावेश आहे.

ज्या तीन कोरोना बाधित रुग्णांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. यामध्ये ७२ वर्षीय रुग्ण राहणार मामा चौक गोंदिया यांचा खाजगी रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाला. यांना उच्च रक्तदाबाचा त्रास होता. ६५ वर्षीय रुग्ण राहणार चारगाव (रावणवाडी) यांचा शासकीय वैद्यकीय महाविद्यालय गोंदिया येथे उपचारादरम्यान मृत्यू झाला. ६८ वर्षीय रुग्ण यांचा खाजगी रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाला.

विषाणू चाचणी प्रयोगशाळेत तपासणीसाठी एकूण ३०३०९ नमुने पाठविण्यात आले. यामध्ये २३७११ नमुने निगेटिव्ह आले. तर ४६४१ नमुने पॉझिटिव्ह आले आहे. ३३४ नमुन्यांच्या अहवाल प्रलंबित असून १६२२ नमुन्यांचा अहवाल अनिश्चित आहे.

विविध संस्थात्मक विलगिकरण कक्षात ३ व्यक्ती आणि गृह विलगिकरणात २९१ व्यक्ती अशा एकूण २९४ व्यक्ती विलगिकरणात आहेत. कोरोना बाधितांचा त्वरित शोध रॅपिड अँटीजेन टेस्टमधून घेण्यात येत आहे. या चाचणीतून आतापर्यंत २६६६३ व्यक्तींचे नमुने घेण्यात आले. यामध्ये २४१४० व्यक्तींचे अहवाल निगेटिव्ह आले. २५२३ व्यक्तींचे अहवाल पॉझिटिव्ह आढळून आले आहे.

कोरोना विषाणूचा संसर्ग रोखण्यासाठी १०४ चमू आणि ९७ सुपरवायझर, ९७ कॅटेंटमेंट क्षेत्रासाठी नियुक्त केले आहे. यामध्ये गोंदिया तालुका-७, आमगाव तालुका-६, सालेकसा तालुका-४, देवरी तालुका-२२, सडक/अर्जुनी तालुका-७, गोरेगाव तालुका-२०, तिरोडा तालुका-२५ आणि अर्जुनी/मोरगाव तालुका-६ असे एकूण ९७ कंटेंटमेंट झोन जिल्ह्यात कार्यरत आहे.

रुग्णांच्या सुविधेसाठी सर्व रुग्णांना त्यांनी दिलेल्या मोबाईल क्रमांकावर त्यांचा कोविड-19 चा अहवाल एस.एम.एस.द्वारे कळविण्यात येत आहे. सदरहू अहवाल ग्राह्य धरण्यात यावा.

जिल्ह्यात कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रत्येक नागरिकाने माझे कुटुंब-माझी जबाबदारी या मोहिमेत सहभागी होऊन शासनाच्या मार्गदर्शक सूचनांचे पालन करावे. असे आवाहन जिल्हा प्रशासनाने केले आहे.