टिळक गौरव पुरस्काराचे मानकरी महेश अग्रवाल

0
9

श्रमिक पत्रकार संघाचे पुरस्कार जाहीर!
शोध वार्तेचा प्रथम पुरस्कार साप्ताहिक बेरार टाईम्स संपादकांना
अग्रवाल, चक्रधर, बिसेन, घासले,कटरे, सपाटे, मोटघरे, अग्रवाल, ढोमणे ठरले मानकरी

गोंदिया,दि. ११: – श्रमिक पत्रकार संघ गोंदियाच्यावतीने दरवर्षीप्रमाणे यावर्षी ही १५ ऑगस्ट रोजी टिळक गौरव पुस्काराचे वितरण तसेच जिल्ह्यातील १० व १२ वीमधील गुणवंत विद्याथ्र्यांचा सत्कार करण्यात येणार आहे. श्रमिक पत्रकार संघाच्यावतीने जिल्ह्यातील पत्रकाराच्या प्रवेशिका आमंत्रित करण्यात आल्या होत्या. पुरस्कार निवड समितीच्या वतीने या प्रवेशिकाची छाननी करून या वर्षीच्या श्रमिक पत्रकार संघाचे पुरस्कार जाहीर करण्यात येत आहेत.यामध्ये संघाच्यावतीने देण्यात येणारा टिळक गौरव पुरस्कार देशहितचे संपादक महेश अग्रवाल यांना तर स्व.संतोष अग्रवाल शोध वार्ता प्रथम पुरस्कार साप्ताहिक बेरार टाईम्सचे संपादक खेमेंद्र कटरे यांना जाहीर झाला आहे.
या वर्षीच्या जीवनगौरव टिळक पुरस्कारासाठी श्रमिक पत्रकार संघाच्यावतीने गोंदिया शहरातील ज्येष्ठ पत्रकार व देशहितचे संपादक महेश अग्रवाल यांची निवड सर्वानुमते करण्यात आली आहे. इतर स्पर्धा गटासाठी स्व. मनोहरभाई पटेल संपादकीय पुरस्कारासाठी प्रिण्ट मेलचे कार्यकारी संपादक उदय चक्रधर, स्वातंत्र्य सैनिक स्व. हिरालाल जैन विकास वार्ता पुरस्कारासाठी प्रथम पुरस्कार देशोन्नतीचे महेन्द्र बिसेन व भास्करचे प्रतिनिधी भरत घासले यांना विभागून दिला जाणार आहे. विकास वार्ता द्वितीय पुरस्कारासाठी नवभारतचे आमगाव येथील प्रतिनिधी भोला गुप्ता व सकाळचे गोरेगाव तालुका प्रतिनिधी डिलेश्वर पंधराम यांची निवड करण्यात आली आहे. स्व. शंकरलाल अग्रवाल स्मृती वृत्त वाहिनी प्रथम पुरस्कारासाठी युसीएनचे प्रतिनिधी हरिष मोटघरे व द्वितीय पुरस्कारासाठी जय महाराष्ट्र टी.व्ही.चे अभय अग्रवाल यांची निवड करण्यात आली आहे. स्व. संतोष अग्रवाल स्मृती शोध पत्रकारिता पुरस्कारासाठी प्रथम पुरस्कार साप्ताहिक बेरार टाईम्सचे संपादक खेमेंद्र कटरे व द्वितीय पुरस्कार भंडारा पत्रिकाचे जिल्हा प्रतिनिधी ओमप्रकाश सपाटे यांना जाहीर करण्यात आले आहे. श्रमिक पत्रकार संघातर्फे दिल्या जाणाèया उत्कृष्ट छायाचित्र पुरस्कारासाठी दै. भास्करचे शुभम ढोमणे यांची निवड करण्यात आली आहे.
यावर्षी श्रमिक पत्रकार संघातर्फे आयोजित करण्यात आलेल्या स्पर्धेसाठी जिल्ह्यातील अनेक पत्रकारांनी उत्स्र्फूरित्या सहभाग घेतला. परीक्षक म्हणून ज्येष्ठ पत्रकार माणिक गेडाम, जिल्हा माहिती अधिकारी विवेक खडसे व लोकमतचे जिल्हा प्रतिनिधी मनोज ताजणे यांनी जवाबदारी पार पडली. गुणवंत विद्याथ्र्यात १२ वीच्या परीक्षेत जिल्ह्यातून प्रथम विवेक मंदिर कनिष्ठ महाविद्यालय गोंदियाची तेजश्री बालपांडे (९६.६१), द्वितीय क्रमांक प्रोग्रेसिव्ह कनिष्ठ महाविद्यालयाचा हरेंद्रजित कलवंतqसग अरोरा (९६.१५), तृतीय क्रमांक महावीर मारवाडी कनिष्ठ महाविद्यालयाची मित हरिणखेडे (९५.२३), १० वीच्या परीक्षेत जिल्ह्यातील प्रथम आदर्श विद्यालय आमगावची विद्यार्थिनी वैष्णवी शेंडे (९७.२०), द्वितीय क्रमांक विवेक मंदिर हायस्कूलचा विद्यार्थी श्रेयष वैद्य (९६.६) व तृतीय क्रमांकावर असलेले विवेक मंदिर गोंदियाची कु. ख्याती पलन व मनोहरभाई पटेल हायसकूल देवरीचा प्रांजल राऊत (९६.२०) या विद्याथ्र्यांचा सत्कार केला जाणार आहे. सर्व विजेत्या पत्रकाराचे श्रमिक पत्रकार संघाचे अध्यक्ष हाजी अल्ताफ शेख, सचिव संजय राऊत, कार्यक्रमाचे संयोजक प्रा.एच.एच. पारधी, उपाध्यक्ष हिदायत शेख, सहसचिव दिलीप लिल्हारे व इतर पदाधिकारी व सदस्यांनी अभिनंदन केले आहे. सर्व विजेत्यांना १५ ऑगस्ट रोजी दुपारी १२ वाजता राईस मिलर्स असो.च्या सभागृहात जिल्ह्याचे पालकमंत्री ना. राजकुमार बडोले यांच्या हस्ते पुरस्काराचे वितरण केले जाणार आहे. कार्यक्रमाला प्रमुख अतिथी म्हणून राज्यसभा सदस्य प्रफुल पटेल, खासदार नाना पटोले, आमदार राजेंद्र जैन, आ. गोपालदास अग्रवाल, आ. विजय रहांगडाले, आ. संजय पुराम, जि.प. अध्यक्ष उषा मेंढे, भाजपा जिल्हाध्यक्ष विनोद अग्रवाल, जिल्हाधिकारी डॉ. विजय सूर्यवंशी, जिल्हा पोलीस अधीक्षक शशीकुमार मिना, जि.प.चे मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप गावडे, राईस मिलर्स असोचे अध्यक्ष अशोक अग्रवाल, जिल्हा माहिती अधिकारी विवेक खडसे उपस्थित राहणार आहेत.