29.8 C
Gondiā
Thursday, August 6, 2026
Home विदर्भ डाक पतसंस्थेवर परिवर्तन पॅनलचा कब्जा

डाक पतसंस्थेवर परिवर्तन पॅनलचा कब्जा

0
17

गोंदिया दि.१९: तालुका डाक कर्मचारी सहकारी पतसंस्थेच्या निवडणुकीत परिवर्तन पॅनलचा विजय झाला. माजी सचिव आनंदराव वाढई सर्मथित पॅनलच्या ११ संचालकांनी दणदणीत विजय मिळविला.
या निवडणुकीत तुळशीराम लांजेवार, महेंद्र बारापात्रे, राजकुमार दखने, खुमानसिंह पटले, बळीराम मुंगमोडे, शेख रफिक चाँद, पुरण डोंगरे प्रकाश सुर्यवंशी, धुरपता चुटे, सायना बहेकार, धनराज नागोसे हे संचालक म्हणून निवडून आले.
यावेळी विजयी संचालकांनी गुलाल खेळून आनंदोत्सव साजरा केला. आनंद खापर्डे, कावळे, डी.एन. राऊत, श्रीवास्तव, महारवाडे, बन्सोडकर, बागडकर, खडगी, जायस्वाल, पाथोडे, भुरे, हरिणखेडे, टेंभरे, शाखा डाकपाल व ग्रामीण डाकपाल उपस्थित होते.