114 रूग्णांनी केली कोरोनावर मात;दोघांचा मृत्यू : नवे 95 पॉझिटिव्ह

0
512

गोंदिया,दि.23 – कोरोना विषाणूचा संसर्ग जिल्ह्यात थोड्याफार प्रमाणात कमी झाला असला तरी जिल्ह्यातील नागरिकांनी दुर्लक्ष करून चालणार नाही.प्रत्येकाने संसर्ग होणार नाही यासाठी काळजी घेणे आवश्यक आहे.जिल्ह्यात विविध कोविड केअर सेंटर व रुग्णालयात भरती असलेले 114 रुग्ण उपचारातून बरे झाल्याने आज त्यांना सुट्टी देण्यात आली. गोंदियाच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या विषाणू संशोधन व निदान प्रयोगशाळेतून आज 23 ऑक्टोबर रोजी प्राप्त अहवालानुसार नव्या आणखी 95 कोरोना पॉझिटिव्ह रूग्णांची भर पडली.70 वर्षीय रुग्णाचा गोंदियाच्या खाजगी रुग्णालयात आणि 45 वर्षीय रुग्णाचा वैद्यकीय महाविद्यालयात उपचारादरम्यान मृत्यू झाला.हे दोन्ही रुग्ण हे गोंदिया शहरातील होते.

नव्याने आढळलेल्या आजच्या 95 बाधित रुग्णांची संख्या तालुकानिहाय पुढीलप्रमाणे. गोंदिया तालुका -50, तिरोडा तालुका -01, गोरेगाव तालुका -04,आमगाव तालुका-02, सालेकसा तालुका-05, देवरी तालुका- 14, सडक/अर्जुनी तालुका -10, अर्जुनी/मोरगाव तालुका -06 आणि इतर राज्य/ जिल्ह्यातील तीन रुग्ण आढळून आले.

बाधित आढळलेले आतापर्यंतचे रुग्ण तालुकानिहाय पुढीलप्रमाणे. गोंदिया तालुका -5255, तिरोडा तालुका -1124, गोरेगाव तालका- 376,आमगाव तालुका -629, सालेकसा तालुका -382, देवरी तालुका-426, सडक/अर्जुनी तालुका-389,अर्जुनी/मोरगाव तालुका-460 आणि बाहेर जिल्हा व इतर राज्यात आढळलेले- 103 रुग्ण आहे.असे एकूण 9144 रुग्ण कोरोना बाधित आढळले.

विविध कोविड सेंटरमध्ये व रुग्णालयात उपचार घेत असलेल्या 114 रूग्णांनी औषधोपचारातून आज कोरोनावर मात केली.तालुकानिहाय ती संख्या पुढीलप्रमाणे.गोंदिया तालुका -45, तिरोडा तालुका-18, गोरेगाव तालुका -15, आमगाव तालुका -02, सालेकसा तालुका-05, देवरी तालुका -17, सडक/अर्जुनी तालुका – 01 आणि अर्जुनी/मोरगाव तालुका-11 असा आहे.

जिल्ह्यातील 7998 रूग्णांनी आतापर्यंत कोरोनावर मात केली.ती रुग्ण संख्या तालुकानिहाय पुढीलप्रमाणे.गोंदिया तालुका -4614, तिरोडा तालुका- 1034,गोरेगाव तालुका -346, आमगाव तालुका -541,सालेकसा तालुका- 364, देवरी तालुका- 348,सडक/अर्जुनी तालुका-319,अर्जुनी/मोरगाव तालुका-352 आणि इतर-80 रुग्णांचा समावेश आहे.

कोरोना क्रियाशील असलेल्या जिल्ह्यातील रूग्णांची संख्या तालुकानिहाय पुढीलप्रमाणे आहे. गोंदिया तालुका -571,तिरोडा तालुका-74,गोरेगाव तालुका- 26, आमगाव तालुका -82,सालेकसा तालुका -16, देवरी तालुका-76, सडक/अर्जुनी तालुका- 67,अर्जुनी/मोरगाव तालुका-104 आणि बाहेर जिल्हा व बाहेर राज्यातील 13 असे एकूण 1029 रुग्ण कोरोना क्रियाशील आहेत.

क्रियाशील असलेले 571 रुग्ण घरीच अलगीकरणात आहे.तालुकानिहाय ते पुढीलप्रमाणे. गोंदिया तालुका-255, तिरोडा तालुका-30, गोरेगाव तालुका -21,आमगाव तालुका-61, सालेकसा तालुका-09,देवरी तालुका -70,सडक/अर्जुनी तालुका-51, अर्जुनी/मोरगाव तालुका-74 रुग्ण आहेत.

बाधित रुग्ण आजारातून बरे होण्याचे प्रमाण 86.17 टक्के आहे.बाधीत रुग्णांचा मृत्यु दर हा 1.23 टक्के आहे.तर डब्लिंग रेट हा 63.3 टक्के इतका आहे.

आतापर्यंत 117 कोरोनाबाधित रुग्णांचा मृत्यू झाला. यामध्ये गोंदिया तालुका-70, तिरोडा तालुका-16, गोरेगाव तालुका-4, आमगाव तालुका -6, सालेकसा तालुका-2,देवरी तालुका-2, सडक/अर्जुनी तालुका-3, अर्जुनी/मोरगाव तालुका -4 व बाहेर जिल्हा व राज्यातील दहा रुग्णांचा समावेश आहे.

गोंदियाच्या विषाणू संशोधन व निदान प्रयोगशाळेत तपासणीसाठी एकूण 36641 नमुने पाठविण्यात आले. यामध्ये 27798 नमुने निगेटिव्ह आले. तर 5738 नमुने पॉझिटिव्ह आले आहे.89 नमुन्यांच्या अहवालाची प्रतिक्षा आहे.

जिल्ह्यात गृह विलगिकरणात 174 आणि संस्थात्मक विलगीकरणात 2 व्यक्ती आहे. रॅपिड अँटीजेन चाचणीतून आतापर्यंत 32614 व्यक्तींचे नमुने घेण्यात आले. यामध्ये 29281 व्यक्तींचे अहवाल निगेटिव्ह आले. 3333 व्यक्तींचे अहवाल पॉझिटिव्ह आढळून आले.

10 चमू आणि 8 सुपरवायझर कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी कार्यरत आहे .यांची नियुक्ती जिल्ह्यातील 8 कॅटेंटमेंट क्षेत्रासाठी केली आहे. यामध्ये गोंदिया तालुका -01,आमगाव तालुका -00 सालेकसा तालुका-00, देवरी तालुका -00, सडक/अर्जुनी तालुका -01, गोरेगाव तालुका-00, तिरोडा तालुका -06 आणि अर्जुनी/मोरगाव तालुका -00 असे कंटेंटमेंट झोन आहे.