लाखनी तालुका अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे पुनर्गठन

0
21

लाखनी दि.२१:: अखिल भारतीय अंधश्रद्धा निर्मूलन समिती तालुका शाखा लाखनीची सभा तालुका कार्यालयात जिल्हाध्यक्ष मदन बांडेबुचे यांचे अध्यक्षतेखाली घेण्यात आली. यावेळी अखिल भारतीय अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे जिल्हा संघटक वसंत लाखे, जिल्हा सचिव मुलचंद कुकडे व जिल्हा महिला संघटिका प्रिया शहारे उपस्थित होते.
यावेळी लाखनी तालुका अ.भा. अंनिस कार्यकारिणीचे पुनर्गठन केले. यात तालुका संघटक प्रा. अशोक गायधने, तालुकाध्यक्ष नामदेव कान्हेकर, तालुका सचिव अशोक वैद्य, तालुका सहसचिव वसिष्ठ रहांगडाले, तालुका उपाध्यक्ष अनिता नंदागवळी, कोषाध्यक्ष पंकज भिवगडे, तालुका प्रसिद्धी प्रमुख से.नि. प्राचार्य गजेंद्र गजभिये, योगेश वंजारी, शिवानी काटकर यांची निवड करण्यात आली. कार्यकारिणी सदस्यांमध्ये आशा रंगारी, देवकन्या गडपायले, छाया गायधनी, प्रा. मधुकर तुरकाने, अँड. प्रशांत गणवीर, देवकन्या गडपायले, छाया गायधनी, प्रा. मधुकर तुरकाने, अँड. प्रशांत गणवीर, देवकन्या गडपायले यांची नेमणूक टाळ्यांच्या गजरात एक वर्षाकरिता करण्यात आली.
या सभेमध्ये शाळा कॉलेजमध्ये अंधश्रद्धा, अनिष्ट जुनाट रूढी अघोरी प्रथा निर्मूलन कायद्याविषयी जागृती करण्याकरिता शासनाचे पत्रक देऊन जागृती कार्यक्रम घेण्याचे ठरले. आगामी ऑक्टोबरमध्ये एक दिवसीय तालुका शिबिर आयोजित करण्याविषयी चर्चाकरण्यात येवून सभासद नोंदणीवर भर देण्यात आला. प्रास्ताविक नामदेव कानेकर, संचालन प्रा. अशोक गायधने, आभार प्रदर्शन अशोक वैद्य यांनी केले.