देवरी नगरपंचायतींचे आरक्षण जाहीर

0
29

देवरी दि.२१: देवरीच्या नगर पंचायत निवडणुकीकरिता प्रभाग रचना व जातीनिहाय आरक्षण सोडत गुरूवारी देवरी तहसील कार्यालयात उपविभागीय अधिकारी सुनील सूर्यवंशी व तहसीलदार संजय नागटीळक यांच्या उपस्थितीत गावकर्‍यांसमोर काढण्यात आली.विशेष म्हणजे अगोदर देवरी ग्रा.पं.मध्ये ६ प्रभाग होते व आता १७ प्रभाग झाल्याने कोणते क्षेत्र कोणत्या प्रभागात आहे याबद्दल लोकांना अजूनपर्यंत माहिती नाही. पहिल्यांदाच नगर पंचायतचा दर्जा मिळाल्याने लोकांमध्ये निवडणुकीबद्दल उत्सुकता आहे. यामुळे निवडणूक लढण्यास इच्छुकांची संख्या वाढणार आहे. देवरी येथील आरक्षण सोडतीप्रसंगी उपस्थित नागरिक.
नगर पंचायतच्या १७ जागांकरिता होत असलेल्या या निवडणुकीत नामाप्रकरीता ५, सर्वसाधारण करिता ७, अनुसूचित जातीकरिता ३व अनुसूचित जमातीसाठी ३जागा आरक्षित झाल्या आहेत. त्यामध्ये प्रभाग १ मध्ये नामाप्र (खुला प्रवर्ग), प्रभाग २- नामाप्र (खुला), प्रभाग ३-सर्वसाधारण, प्रभाग ४- अनुसूचित जमाती (महिला), प्रभाग ५- नामाप्र (महिला), प्रभाग ६ नामाप्र (महिला), प्रभाग ७-सर्वसाधारण (महिला), प्रभाग ८-सर्वसाधारण (महिला), प्रभाग ९ सर्वसाधारण, प्रभाग १0- अनुसूचित जाती (खुला), प्रभाग ११- नामाप्र (महिला). प्रभाग १२- अनुसूचित जमाती (खुला), प्रभाग १३-अनुसूचित जाती (महिला), प्रभाग १४- अनुसूचित जाती (महिला), प्रभाग १५-सर्वसाधारण, प्रभाग १६- सर्वसाधारण, प्रभाग १७- अनुसूचित जमाती (महिला) असे आरक्षण जाहीर झाले.