साकोली होणार नगरपरिषद

0
11

साकोली सेंदुरवाफाची लोकसंख्या २५ हजार

साकोली दि.२३: शासनस्तरावरून साकोली नगर पंचायतीच्या निवडणुकीची प्रक्रिया वेगात आली असतानाच पुन्हा एकदा साकोली व सेंदुरवाफा नगर परिषदेच्या निर्मितीचे वातावरण तयार झाले आहे.
दोन दिवसांपुर्वी शासनस्तरावरून साकोली सेंदुरवाफा नगरपरिषदेचा अहवाल मुंबईला पोहचला आहे. त्यामुळे नगरपरिषदेच्या प्रक्रियेला सुरवात झाली असून प्रशासन पुन्हा एकदा कामाला लागले आहे. त्यामुळे नगरपंचायतीसाठी काढण्यात आलेले आरक्षणाचे काय, असा प्रश्न भेडसावत आहे. फेब्रुवारी महिन्यात साकोली नगरपंचायतीची घोषणा झाली. त्यानंतर येथे प्रशासक नेमण्यात आले व तेव्हापासून येथील कामकाज हे नगरपंचायतीच्या नियमानुसार सुरूहोते. ऑक्टोबर महिन्यात नगरपंचायतीच्या निवडणुकीसाठी निवडणूक आयोगाच्या आदेशानुसार आरक्षण काढणे, प्रभागाची रचना काढणे, प्रभागनिहाय नकाशे तयार करणे आदी प्रक्रिया पुर्ण झाले असताना मागील आठवड्यात आलेल्या पत्रानुसार चर्चांना उधान आले आहे. या पत्रानुसार साकोली नगरपंचायतीच्या कार्यवाहीला तात्काळ स्थगिती देऊन साकोली तालुक्याला नगरपरिषदेचा दर्जा देण्याबाबत सुचना आली.
आमदार बाळा काशीवार यांनी यासाठी प्रयत्न करून उपविभागीय अधिकारी दिलीप तलमले यांचेशी चर्चा केली. या चर्चेनंतर उपविभागीय अधिकारी तलमले यांनी साकोली सेंदुरवाफा नगरपरिषदेचा अहवाल तयार करून जिल्हाधिकार्‍यांना सादर केला व जिल्हाधिकारी कार्यालयातून हा अहवाल नगरविकास मंत्रालय व राज्य निवडणूक आयोगकडे पाठविण्यात आला. या अहवालावर सोमवारी दि.२४ ला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस याची स्वाक्षरी होवून पुढील कार्यवाहीसाठी हा अहवाल राज्यपालाकडे जाण्याची शक्यता आहे. त्यामुळे पुढील आठवड्यात या नगरपरिषदेचे चित्र स्पष्ट होऊ शकते.