विज वितरण कंपनीच्या कर्मचार्यांनी केली निदर्शन

0
184

गोंदिया,दि.12ः- महाराष्ट्र राज्य विद्युत मंडळातील तीन कंपन्या(महावितरण,महापारेषण, महानिर्मिती) मध्ये कार्यरत ८६००० कामगार, कर्मचारी, अधिकारी,अभियंते आपल्या विविध मागण्यांना घेऊन लक्ष्मीपूजनाच्या दिवशी जाणार संपावर जाणार आहेत.त्यापुर्वी आज गुरुवारला त्यांनी कार्यालयाच्या प्रवेशव्दारावर निदर्शने करीत घोषणाबाजी केली.
दरवर्षी दिपावलीच्या निमित्ताने कंपनी कडून बोनस, सानुग्रह अनुदानाची रक्कम कामगार कर्मचारी अभियंता अधिकारी यांना वाटप करण्यात येत असते. परंतु यावर्षी प्रशासनाने वाटप करण्यास नकार दिल्याने कामगार कर्मचारी अभियंता अधिकारी यांनी १४ नोव्हेंबर २०२०,लक्ष्मीपुजन,या दिवशी संपावर जाण्याचा निर्णय राज्यस्तरीय सर्व संघटनां कृती समितीने घेतला आहे.त्याकरीता आज गोंदिया परीमंडळ कार्यालयासमोर दुपारी १:३० वाजता निदर्शने करण्यात आली.