अन्न व औषध मंत्री डॉ शिंगणे यांनी तपासले स्वीटमार्ट व हॉटेल्स व्यवसायिकांमध्ये खळबळ

0
136

बुलढाणा – सध्या सणासुदीचे दिवस सुरू असून बाजारामध्ये मोठमोठी मिठाईची व फराळाची दुकाने लागली आहे. या दुकानांमधून नागरिकांना शुद्ध व चांगली मिठाई व फराळ मिळते का याची तपासणी राज्याचे अन्न व औषध प्रशासन मंत्री मा ना डॉ राजेंद्रजी शिंगणे यांनी स्वतः केली.
शहरातील संगम चौक, जयस्तंभ चौक, कारंजा चौक, बाजार गल्ली येथील 12 ते 15 खाद्य पदार्थाचे स्टॉल व स्वीट मार्टची यावेळी तपासणी केली. यामध्ये खाद्यपदार्थावर निर्माण तारीख, खाण्यास योग्य असल्याची तारीख, परवाना, खाद्य पदार्थ झाकून ठेवले आहे किंवा नाही, पदार्थ बनविणारे कारागीर हातांची स्वछता राखतात की नाही, ज्या ठिकाणी खाद्य पदार्थ बनविले जातात त्याठिकाणी स्वच्छता आहे की नाही याची तपासणी अन्न व औषध प्रशासन मंत्री डॉ शिंगणे यांनी केली. ज्या दुकानदारांनी नियमांचे पालन केलेले नाही त्यांच्यावर कडक कारवाई करण्याचे आदेश मंत्री महोदयांनी अन्न व औषध प्रशासन विभागाच्या अधिकाऱ्यांना दिले. एन दिवाळीच्या दिवशी स्वतः मंत्र्यांनी सुरू केलेल्या या धडक कारवाई मुळे शहरातील हॉटेल व्यवसायिकांमध्ये एकच खळबळ उडाली आहे.