केशोरी पोलिसांची चिचटोला येथे आदिवासीबांधवासोबंत दिवाळी साजरी

0
198

अर्जूनी/मोर(संतोष रोकडे),दि.15ः- जिल्हा पोलिसांच्यावतीने एक दिवाळी आदिवासींसोबत अभियानांतर्गत केशोर पोलीस ठाणेंतर्गत येत असलेल्या चिचटोला येथे केशोरी पोलिसांनी आदिवासी बांधवाना दिवाळीचे साहित्य वाटप करीत त्यांच्यासोबत दिवाळीचा आनंद घेतला.पोलीस अधिक्षक विश्व पानसरे,अप्पर पोलीस अधिक्षक (देवरी कँप)अतुल कुलकर्णी यांच्या संकल्पनेतुन तसेच उपविभागीय पोलीस अधिकारी देवरी जालिंदर नालकुल यांच्या मार्गदर्शनाखाली अर्जुनी/मोर तालुक्यातील पोलीस स्टेशन केशोरी कार्यक्षेत्रातील ग्राम चिचटोला येथे(दि.14)केशोरीचे ठाणेदार बाबु एस मुंडे यांच्या उपस्थितित कार्यक्रम पार पडला.
केशोरी पोलीस स्टेशन हद्दीतील भाग हा अती दुर्गम व संवेदनशील असुन ह्या भागात राहणारे बहुसंख्येने आदिवासी बांधव असून या भागात कोणतेही रोजगार व उद्योग धंदे अस्तित्वात नाही.त्यामुळे त्यांची शहरी भागाकडे ओढ असते.परंतु कोवीड 19 ने उद्भवलेल्या परिस्थितीमुळे सर्व प्रकारचे कामधंदे ठप्प असल्याने येथील आदिवासी जनतेला उदरनिर्वाह कसा करावा असा प्रश्न निर्माण झाला.त्यातच दिवाळीसारखा मोठा सण आल्याने त्यांची दिवाळी अंधारात जाईल की काय अशा चिंतेत असतांनाच जिल्हा पोलीस विभागाचा कार्यभार स्विकारणारे विश्व पानसरे यांच्या संकल्पनेतून यंदाची दिवाळी आदिवासी बांधवांसोबत साजरी करायचे ठरले.
त्यानुसार केशोरीचे प्रभारी पोलीस निरीक्षक बाबु एस मुंडे यांनी ग्राम चिचटोला येथे यंदाची दिवाळी आदिवासी बांधवांसोबत साजरी करण्यासाठी माऊली सेवा मित्र मंडळ नागपूर मंडळाचे प्रमुख सुहास खरे व त्यांचे सर्व सरकारी मित्र परिवार यांच्या मदतीने गावील 200 ते 250 लोकांना धोतर,साड्या,ब्लॉंकेट,दिवाळी फराळ व शालेय मुला मुलींना वह्या ,पेन,पेन्सील,कंपास ,चप्पल,अशा अनेक प्रकारच्या वस्तु वाटप केले.तसेच त्यात रांगोळी स्पर्धा, गायन स्पर्धा अशा विविध स्पर्धाचे आयोजन करुन बक्षीस वितरण करण्यात आले.आयोजनासाठी पोलीस स्टेशन केशोरीचे ठाणेदार बाबु एस. मुंडे व त्यांचा पोलीस स्टाँफ व सी 60 पथकाने अथक परिश्रम घेतले.