महापौर चेतनभाऊ गावंडे यांनी साधला बालकलाकारांशी संवाद

0
207
अमरावती,दि.15ः येथील शिवाजी नगर काॅलनी नंबर एकमधील बालकलाकारांनी एकत्र येऊन तयार केलेल्या रायगड किल्ला प्रतिकृतीची पाहणी करुन दिवाळीच्या पर्वावर दिपप्रज्वलन करुन महापौर चेतन गावंडे यांनी बालकलाकरांशी संवाद साधत त्यांचे अभिनंदन केले. महाराष्ट्राची संस्कृती छत्रपती शिवाजी महाराजांचे संस्कार नविन पिढिला जागृत व सदैव प्रेरणादाई आहे. हाच वसा पुढे सुरु ठेवत सांरग रमेश गावंडे या इंजिनियर असलेल्या युवकाने गडकिल्ले संवर्धन व ऐतिहासिक परंपरा कायम ठेवण्यासाठी रायगड किल्ला , मावळे,प्राणी,खंदक,तोफ,शस्रागार, तलवार, पताका, देऊळ, पाऊलवाट,हिरवळ,विहिर,छोटी घरे असा माती व दगड,शेण यापासून हुबेहूब रायगड किल्ला तयार केला. अमरावती महानगराचे महापौर चेतनभाऊ गावंडे यांच्या हस्ते राजे छत्रपती शिवाजी महाराजांच्या मुर्तीचे पुजन करुन माल्यार्पण करण्यात आले.महापौर यांनी उपस्थित नगरवासीयांना शिवाजी महाराजांच्या कार्याचे आपल्या शब्दात मार्गदर्शन केले.अश्या  उपक्रमाच्या माध्यमातून युवकदिनाच्या मनात राष्ट्रप्रेम निर्मान होऊन उध्याचा सक्षम नागरीक तयार होतो.यासोबतच त्यांनी छोट्या मुलांना बालदिनाच्या शुभेच्छा दिल्या .कोरोना संकटात सर्वानी शासनामार्फत दिल्या जात असलेल्या सुचनांचे पालन करावे असे सांगीतले .यामध्ये बालकलाकार सारंग गावंडे,पार्थ,समर्थ,श्रीजित,उत्कर्ष,आलेख,स्वराज,प्रसन्न, काव्या,ओवी,मयंक,मंथण,यांनी परीश्रम घेतले.याप्रसंगी रमेश गावंडे , सोपान माहुलकर,धिरज भागवत,सुनिल शिंदे,अविनाश दातिर,अनंत मानके,नितीन प्रधान,रोहन लुंगीकर,अक्षय परीमल,प्रविण थोरवे,सचिन घाटे,दिपक अंबरते , केशव खंडारे व मोठ्या संखेने महीला उपस्थित होत्या . सुत्रसंचालन सारंग गावंडे यांनी केले तर आभार प्रा.दिपक अंबरते यांनी मानले.