रानडुकराच्या हल्ल्यात महिला जखमी

0
13

गोरेगाव,दि. २९- तालुक्यातील घोटी येथे रानडुकराने गावात शिरून घरी काम करीत असलेल्या महिलेवर हल्ला केल्याने ती गंभीर जखमी झाल्याची घटना आज (ता.२९) रोजी सकाळी ११ वाजताच्या सुमारास घडली. कल्पना कामराज पटले (वय ४२) असे हल्ल्यात जखमी झालेल्या महिलेचे नाव आहे.
कल्पना या घरी मागील परसबागेत काम करीत असताना रानडुकराने त्यांच्यावर हल्ला केला. यात त्या गंभीर जखमी झाल्या. दरम्यान त्यांना गोरेगाव येथील ग्रामीण रुग्णालय व नंतर गोंदिया येथील केटीएस जिल्हा सामान्य रुग्णालय व नंतर गोंदिया येथील केटीएस जिल्हा सामान्य रुग्णालययात उपचारासाठी दाखल करण्यात आले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहे. घटनेची माहिती वन विभागाला देण्यात आली असून कल्पना यांना उपचारासाठी आर्थिक मदत देण्याची मागणी कुटुंबीयांनी केली आहे.