२७ सप्टेंबरला आरक्षणाबाबत होणार चर्चा

0
19

नागपूर, दि. १६-स्वातंत्र्योत्तर काळापासून आरक्षणाचा लढा सुरु आहे. काही वर्गांना आरक्षण मिळाले आहे. मात्र, आजही मागासवर्गातील उन्नती-प्रगती उंचावलेली नाही तर ज्यांना आरक्षण प्राप्त नाही ते वर्गही आता आरक्षणाची मागणी करू लागले आहेत. आरक्षणावर नेहमीच प्रश्न उपस्थित केल्या जातात. यामुळे महाराष्ट्र ऑफिसर्स फोरमच्या विभागीय समिती नागपूरच्या वतीने आरक्षण परिषदेचे आयोजन करण्यात आले आहे. भारतीय संविधानाने दिलेल्या तरतुदी नुसार मुलभूत अधिकार व कर्तव्य, संविधान सभेतील आरक्षणाबाबत चर्चा आणि सद्यस्थितीत होणारी चर्चा, याबाबतची स्पष्टता तसेच आरक्षणाचे लाभार्थी (एससी,एसटी, ओबीसी, वीजे/एनटी,एसबीसी) महिला, युवक आणि सर्व सामान्यांना माहिती व्हावी म्हणून आरक्षण परिषदेचे आयोजन रविवार २७ सप्टेंबरला दुपारी १२ ३० वाजता डॉ. वसंतराव देशपांडे सांस्कृतिक सभागृह सिव्हील लाईन, नागपूर येथे करण्यात आले आहे. या कार्यक्रमाचे अध्यक्ष इ.झेड.खोब्रागडे तसेच प्रमुख पाहुणे प्रा. देविदास घोडेस्वार, हरी नाईक यांच्या उपस्थितीत कार्यक्रमात आरक्षणासंदर्भात चर्चा करण्यात येणार आहे.