जनगणनेचे जातिनिहाय आकडे जाहिर करा

0
6

चंद्रपूर- दि. १६,केंद्र सरकारच्यावतीने २०१३ ला केलेल्या जातीय जनगणनेचे आकडे सविस्तर जाहिर करुन भारतीय समाज जिवनाचे सामाजिक, शैक्षणिक, आर्थिक क्षेत्रातील सुस्पष्ट चित्र देशवासीयांसमोर मांडण्यात यावे, अशी मागणी सेल्फ रिस्पेक्ट मुव्हमेंटच्या शिष्टमंडळाने केली आहे.
स्वतंत्र भारताच्या ६७ वर्षात भारतीय जनतेच्या शैक्षणिक सामाजिक व आर्थिक मागासलेपणा दूर करण्यात सरकारला किती यश आले. प्रशासनात मागास जातीचा सहभाग किती वाढला ही आकडेवारी २०१३ च्या जातीय जनगणनेत करण्यात आली आहे. ती केंद्र सरकारने जनतेसाठी जाहिर करावी, अशी मागणी शिष्टमंडळाने केली. यावेळी मुख्य संघटक बळीराज धोटे, पी. एम. जाधव, राजकुमार जवादे, विनोद सोनटक्के, डॉ. बाळकृष्ण भगत, दिलीप होरे, विजय शिंदे, सूर्यभान झाडे, सतिश निमसरकर, नितीन डोंगरे, राकेश कालेशवार, अशोक मेश्राम, योगेश पडवेकर आदींचा सहभाग होता.