काटीत विस्तारीत समाधान शिबिर उत्साहात

0
9

गोंदिया,,दि.१८-गोंदिया तालुक्यातील काटी येथील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभागृहात विस्तारीत समाधान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.शिबिराचे उदघाटन आमदार गोपालदास
राजस्व विभाग का ग्राम शिबिराचे उदघाटन आमदार गोपालदास अग्रवाल यांच्या हस्ते करण्यात आले.अध्यक्षस्थानी उपविभागीय अधिकारी के.एन.के.राव होते.यावेळी पंचायत समिती सभापती श्रीमती गौतम,जिल्हा परिषद सदस्य रजनी गौतम,तहसिलदार संजय पवार,गटविकास अधिकारी,रावणवाडीचे पोलिस निरीक्षक निबाडकर,उपसभापती ओमप्रकाश भक्तवतीर्,तालुका आरोग्य अधिकारी डाॅ.त्रिपाठी,,सरपंच अमृतलाल तुरकर,आनंद तुरकर,आशिष चौहान,राजेश सोनवाने,राम गुप्ता यांच्यासह तलाठी,ग्रामसेवक,कृषी अधिकारी,विज वितरण विभागाचे अधिकारी या समाधान शिबिरात उपस्थित होते.आमदार अग्रवाल यांनी शासकीय योजनांचा लाभ जनतेपयर्ंत पोचविण्याचे आवाहन करीत समाधान शिबिराच्या माध्यमातून जनतेची कामे लवकरात लवकर करण्याचे आवाहन केले.यावेळी सभापती श्रीमती गौतम यांनीही विचार व्यक्त केले.