खा.पटेल 21 व २२ रोजी भंडारा/गोंदिया जिल्ह्यात

0
8

गोंदिया,दि.१८- राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते राज्यसभा खासदार प्रफुल्ल पटेल हे 21 व २२ सप्टेंबर भंडारा गोदिंया जिल्ह्याच्या दौèयावर येत आहेत.पवनी,अड्याळ ,लाखादूंर,साकोली व मोहाडी येथे आयोजित राष्ट्रवादी काँग्रेस कार्यकर्ता मेळाव्याला ते मार्गदर्शन करणार आहेत. रात्री गोंदियाला आगमन होऊन मुक्काम करुन 22 सप्टेंबरला दुपारी १२ वाजे गोरेगाव कृषी उत्पन्न बाजार समिती हॉल येथे कार्यकर्ता बैठक, १.३० वाजे सडक अर्जुनी येथे कार्यकर्ता बैठक, ३ वाजे देवरी येघील आफताफ डेकोरेशन हॉल येथे आयोजित कार्यकर्ता बैठकीला मार्गदर्शन करणार आहेत. कार्यक्रमाला कार्यकत्र्यांनी व नागरिकांनी अधिकाधिक संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्यावतीने करण्यात आले आहे.