गोवारीटोला येथील ३० पेक्षा अधिकांना मोदकातून विषबाधा

0
10

गोरेगाव, दि.१८:- तालुक्यातंर्गत येणाèया गोवारीटोला(तेढा) येथील नागरिकांना मोदक च्या प्रसादातून ३० पेक्षा अधिकांना विषबाधा झाल्याची घटना गुरुवारच्या रात्री घडली.गणेशमूर्तीची स्थापना झाल्यानंतर १७ सप्टेंबरला सायंकाळी ७.३० वाजेच्या दरम्यान हा प्रकार समोर आला.यामुळे गावातील गणेशभक्तामध्ये भित्तीचे वातावरण निर्माण झाले आहे.सर्व विषबाधीतांना जिल्हा कुवर तिलकqसह सामान्य रुग्णालय व बाई गंगाबाई रुग्णालयात उपचारकरीता दाखल करण्यात आले आहे.यापैकी दोघांची प्रकृती अत्यंत नाजूक सांगितली जात आहे.
गुरुवारला मोठ्या उत्साहात गणेशाची स्थापना करण्यात आली.गोरेगाव तालुक्यातील गोवारीटोला निवासी तोसराम औरासे यांच्या घरी सुध्दा गणेशाची स्थापना करण्यात आली.सायकांळी ७.३० वाजता गणेश आरतीचे आयोजन करण्यात आले होते.यावेळी ३० पेक्षा अधिक नागरिक उपस्थित होते.आरतीनंतर सर्वांना प्रसादाच्या स्वरूपात मोदक वाटले गेले.काही वेळातच सर्वांना उल्टया होऊ लागल्या.यात भोजराम औरासे,विजय चौधरी,अनंतराम औरासे,रवींद्र रहागंडाले,आश्विन औरासे,योगेश औरासे,योगिता चौधरी,गायत्री औरासे,नेहा औरासे,सुमित औरासे आदींना विषबाधा झाली.सर्वांना गोरेगाव येथील ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी आणण्यात आले.परंतु परिस्थिती गंभीर असल्याने तेथून त्यांना जिल्हा सामान्य रुग्णालयात हलविण्यात आले.भरती करण्यात आलेल्यापैकी भोजराज औरासे व विजय चौधरी यांची प्रकृती अत्यंत qचताजनक असल्याने त्यांना अतिदक्षता कक्षात ठेवण्यात आले आहे.

मैदा समजून पोटॉश पावडर मिळविले मोदकात
तोसराम औरासे यांच्या घरी गणेशाच्या स्थापनेनंतर आरतीचे आयोजन करण्यात आले होते.प्रसादाकरिता मोदक तयार करण्यात आले.परंतु चुकीने मैदा समजून पौटॉश पावडरचा वापर मोदक बनविण्यात करण्यात आले.ज्यामुळे मोदक विषारी झाल्याची माहिती रुग्णालयात उपचार घेत असलेल्या विषबाधित व त्यांच्या कुटुंबानी दिली.वास्तविक तपासणीनंतरच मोदक मध्ये विषारी पदार्थ होते की नाही हे कळणार आहे.