मनसेतर्फे प्रवाशी निवाऱ्याचे लोकार्पण

0
17

आमगाव,दि.21-महाराष्ट्र नवनिर्माण सेना आमगाव तालुक्याच्या वतीने प्रवाशी निवारा लोकार्पण कार्यक्रम आज सोमवारला (दि.21)मनसे सरचिटणीस हेमंत गडकरी यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी मनसे जिल्हाध्यक्ष मनीष चौरागडे, पोलीस निरीक्षक औटी, पोलीस उपनिरक्षक पवार, तहसीलदार राजीव शक्करवार, SDO सूर्यवंशी, सामाजिक कार्यकर्ते गिरधारी शिवणकर,प्राचार्य व्ही. डी. मेश्राम, इस्माईल भाई, हामिद मेमन, यासीन शेख, किरण शिंदे, उदय पोफळी, अभय कुरांजेकर हे प्रामुख्याने उपस्थित होते.

यावेळी जिल्हाध्यक्ष मनीष चौरागडे यांनी प्रवाशी निवारा बनवण्याचं काम आमदार खासदार करतात. ज्यांनी काही केल नाही त्यांना तुम्ही परत निवडून देता आणि जे काम करतात त्यांना तुम्ही पाडता. लोकांनी आता तरी ओळखाव की कोण काम करते आणि त्याच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहावे.तसेच येणाऱ्या नगरपंचायत निवडणुकीमध्ये मनसेला साथ देऊन कॉंग्रेस, राष्ट्रवादी, भाजप, सेनेला त्यांची जागा दाखवावी असे आवाहन केले.प्रमुख अतिथी हेमंत गडकरी यांनी आमदार, खासदार,जिल्हा परिषद, पंचायत समिती सदस्य निवडून दिले पण त्यांना आया, बहिणी उन्हात, पावसात उभ्या राहत आहे त्यांच्यासाठी आपण प्रवाशी निवारा बांधावा असे सुद्धा वाटले नाही. पण आमगाववासीयांची सोय शेवटी मुन्ना गवळी यांनी मनसेच्या माध्यमातून केली.

त्या नंतर लगेच पदाधिकारी बैठक हेमंत गडकरी यांनी घेतली व कामांचा आढावा तसेच येणाऱ्या नगरपंचायत निवडणूक मध्ये कसे सामोरे जायचं यावर कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केल. बैठकीत मुन्ना गवळी यांना उपजिल्हाध्यक्ष पदी बढती देण्यात आली. त्यांच्या कडे आमगाव, सालेकसा आणि देवरी तालुक्याचा पत्या नंतर लगेच पदाधिकारी बैठक हेमंत गडकरी यांनी घेतली व कामांचा आढावा तसेच येणाऱ्या नगरपंचायत निवडणूक मध्ये कसे सामोरे जायचं यावर कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केले. बैठकीत मुन्ना गवळी यांना उपजिल्हाध्यक्ष पदी बढती देण्यात आली. त्यांच्या कडे आमगाव, सालेकसा आणि देवरी तालुक्याचा पदभार देण्यात आला.कार्यक्रमाचे आयोजन आमगाव तालुकाध्यक्ष मुन्ना गवळी यांनी केले होते. छोटू हरिणखेडे, चिमु मेश्राम, मोंटू गोहणे, आनंद शेंडे, श्रावण शिवणकर, छोटू ठाकूर, घनश्याम बावनथडे, शकील शेख, सुरेश श्यामकुंवर, जितु शेख, बालक भाऊ, चंदू उके,राधेश्याम तावडे, नूतन सोनवणे, देवचंद सोनवाने, शंकर नागरिकर,कैलाश भागात, कार्तिक बोरकर, देवीलाल रावते आदींनी कार्यक्रमासाठी सहकार्य केले.