पुरवठा विभागात महिन्याकाठी लाखो चा गैरव्यवहार

0
13

तालुका पुरवठा निरीक्षक ठाकरे ची दबंगगिरी
स्वस्त धान्य दुकानदार मनोज दहिकर यांचा आरोप

गोंदियाःदि.२१:-एकीकडे राज्यात सत्तेवर येण्यापूर्वी भ्रष्टाचारमुक्त सरकार आणि प्रषासन देण्याचे आष्वासन देणा-या भाजप सरकारच्या कार्यकाळातच गोंदिया जिल्हयातील पुरवठा विभागात भ्रश्टाचाराचा बोलबाला आहे. गोंदिया तालुक्यातील पुरवठा निरीक्षक रतनलाल ठाकरे यांच्या भ्रश्टाचारी व तानाशाही कार्यप्रणालीमुळे गोंदिया तालुक्यातील 217 रेशन दुकानधारकांना मानसिक व आर्थिक त्रासाला सामोरे जाण्याची वेळ आली आहे. तालुक्यातील कामठा निवासी स्वस्त धान्य दुकानदार मनोज चंदनलाल दहीकर यांनी दिलेल्या माहितीनुसार स्वस्त धान्य उचल करण्याकरिता पुरवठा निरीक्षक रतनलाल ठाकरे प्रत्येक बाबी करिता अवैध रित्या पैष्याची मागणी करतात. पैसे न दिल्यास गोदामातील धान्याची उचल करण्यास ही मज्जाव करतात. या संबंधीचे तक्रार मनोज चंदनकर यांनी जिल्हा पुरवठा अधिकारी प्रशांत काळे, उपविभागीय अधिकारी के.एन.के.राव, गोंदिया तहसीलदार संजय पवार, आमदार राजेंद्र जैन यांच्याकडे करून रेशन दुकानदारांना न्याय मिळवून देण्याची मागणी केली आहे. मनोज चंदनकर यांनी दिलेल्या माहितीनुसार रेशन उचल च्या मागणीपत्राकरिता 500 ते 1000रूपये,चालान करिता 50 ते 100 रूपये व परमिट करिता 100 रूपये, परमिट वर स्वाक्षरी करिता 500 रूपये,गोदामातील बाबू करिता 200 ते 300 रूपये तर रेषनदुकान चैोकशी करिता आल्यास 1000 रूपये,आॅडीट करिता प्रत्येक दुकानदाराकडून 400 रूपये,सेवानिवृत्ती सत्कार समारंभाकरिता ही प्रत्येक दुकानदाराकडून वसूली करून आर्थिक पिळवणूक तहसील कार्यालयातील पुरवठा विभागामार्फत करण्यात येत असल्याचा आरोप मनोज चंदनकर यांनी प्रसिद्धी पत्रकात केला आहे. याच संदर्भात स्वस्त रेशन दुकानदार मनोज चंदनकर हे 16 सप्टेंबर 2015 ला त्यांच्या कामठा येथील दुकानाच्या रेषन धान्य पास करण्याकरिता तालुका पुरवठा निरीक्षक रतनलाल ठाकरे यांच्याकडे गेले असता त्यांनी माझे दुकानाचे धान्य पास केले त्या नंतर चालान पण काढण्यात आली. नंतर चालानवर सही करण्याकरिता परत अवैध रकमेची मागणी केली व ती न दिल्यास त्यांची चालान केराच्या पेटीत फाळून फेकून दिली. या सर्व प्रकरणामुळे मनोज चंदनकर यांच्या प्रतिष्ठेला व स्वाभिमानाला धक्का बसला असल्याचे तसेच अशी वर्तणुक ते प्रत्येक रेशन दुकानदारांशी करीत असल्याचा आरोपही मनोज चंदनकर यांनी केला आहे.

तहसीलदारांकडे चौकशी सोपवली : प्रशांत काळे जिल्हा पुरवठा अधिकारी
या संदर्भात जिल्हा पुरवठा अधिकारी यांना विचारणा केली असता स्वस्त रेशन दुकानदार मनोज चंदनकर यांनी आपल्याकडे सदर प्रकरणाची तक्रार केली असून ती आपण तपासणी व चौकशी करिता तहसीलदार संजय पवार यांच्याकडे दिलेली आहे. तपासात पुरवठा निरीक्षक रतनलाल ठाकरे दोषी आढळल्यास त्यांच्यावर कारवाई करण्या संबंधीचा प्रस्ताव आयुक्तांकडे सादर करण्यात येईल असे जिल्हा पुरवठा अधिकारी काळे यांनी बेरार टाईम्सला सांगितले.