बिबट्याने केल्या शेळ्या फस्त

0
13

सडक अर्जुनी,दि.२३-तालुक्यातील सितेपार किसनपूर येथे बिबट्याने धुमाकूळ घालून चार शेळ्याची शिकार केल्याची घटना सोमवारी रात्री दरम्यान घडली असून यामुळे गावकèयांमध्ये दहशत पसरली आहे.
सितेपार किसनपूर गावात रात्रीच्या सुमारास बिबट्या प्रवेश करुन तुळशीराम मोरबाजी टेटे यांच्या गोठ्यात असलेल्या शेळ्यांवर बिबट्याने हल्ला चढविला. दोन शेळ्यांना गोठ्यातच मारले तर दोन शेळ्यांना गावाच्या बाहेर ओढत नेऊन ठार केले. यात टेटे यांचे ५० हजार रुपयांचे नुकसान झाले आहे. नुकसानग्रस्त तुळशीराम टेटे यांनी मंगळवारी (दि.२२) सकाळी घटनेची माहिती कोसमतोंडीच्या वनक्षेत्रसहायकाला दिली. यावरून राऊंड ऑफिसर जे.जी. खोब्रागडे यांनी घटनास्थळी पोहोचून पंचनामा केला.