गडचिरोलीत डाव्या पक्षांचा मोर्चा दडपला

0
6

गडचिरोली दि.२४: : शेतकरी, शेतमजूर व भूमिहीनांच्या विविध मागण्यांसाठी महाराष्ट्र राज्य किसान सभा, अखिल भारतीय आदिवासी महासंघ, भारत जनआंदोलन, भारतीय कम्युनिस्ट पार्टी व भारिप बहुजन महासंघ यांच्या वतीने बुधवारी मोर्चा आयोजित करण्यात आला होता. मोर्चाला प्रशासनाने परवानगी नाकारून शेकडो कार्यकर्त्यांना स्थानबद्ध केले. संतप्त मोर्चेकऱ्यांनी पोलीस ठाण्यातच सरकारविरोधी घोषणा देत प्रशासनाच्या दडपशाहीचा निषेध केला.मोर्चाचे नेतृत्व करणाऱ्या भारत जनआंदोलनाचे नेते माजी आमदार हिरामण वरखडे, भाकपचे जिल्हा सचिव डॉ. महेश कोपुलवार, भारिप-बमसंचे जिल्हाध्यक्ष रोहिदास राऊत, महेश राऊत, प्रभू राजगडकर, माजी जिल्हा परिषद सदस्य अमोल मारकवार, देवराव चवळे, विनोद झोडगे, अ‍ॅड. जगदीश मेश्राम, हरिपाल खोब्रागडे, चंद्रभान मेश्राम, प्रकाश खोब्रागडे, विशाल दाम्पल्लीवार, बारसिंगे आदींना पोलीस ठाण्यात आणून स्थानबद्ध केले.