आरोग्य विभागाची दीड कोटींची औषधी खरेदी बारगळली

0
13

अमरावती दि.३०: जिल्हा परिषद आरोग्य विभागाकडून जिल्ह्यातील प्राथमिक आरोग्य केंद्र, उपकेंद्र, आयुर्वेदिक व अ‍ॅलोपॅथीक केंद्राना पुरविण्यात येणाऱ्या औषधी खरेदीचा प्रस्ताव आरोग्य सेवा संचालक यांच्यास्तरावर बारगळून पडला आहे. यासोबतच औषध खरेदीसाठी जिल्हा परिषद आरोग्य समितीनंतर स्थायी समितीत मंजूरी साठी व त्यानंतर सर्वसाधारण सभेतही हा प्रस्ताव मंजुरीसाठी अद्यापही सादर करण्यात न आल्याने भविष्यात औषध टंचाईचा सामना करण्याची नामुष्की आरोग्य विभागावर येण्याची शक्यता नाकारता येत नाही.

जिल्हा परिषद आरोग्य विभागा मार्फत जिल्हा भरात ५६ प्राथमिक आरोग्य केंद्र ३३३ आरोग्य उपकेंद्र ,६५ आयुर्वेक दवाखाने, आणि १८ अ‍ॅलोपॅथीक दवाखान्याना औषधीचा पुरवठा केला जातो. यासर्व आरोग्य यंत्रणेला औषधी पुरवितांना जिल्हा परिषद आरोग्य विभागाचे वतीने साधारपणे मी ते जून महिन्यात जिल्ह्यासाठी लागणाऱ्या औषध खरेदीचा प्रस्ताव मंजूरीसाठी राज्याच्या आरोग्य सेवा संचालक यांच्याकडे पाठवावा लागतो. याला वरिष्ठ स्तरावरूण मंजूरी मिळताच शासकीय पॅनेलवर असलेल्या पुरवठा दारामार्फत औषधीचा पुरवठा केला जातो. जिल्हा परिषद आरोग्य विभागामार्फत जवळपास ३६७ प्रकारचे विविध औषधे पुरविण्यात येतात. मात्र मागील काही दिवसापासून अमरावतीसह इतर जिल्हा परिषदांनी औषध पुरवठयाचाजवळपास १ कोटी ८६ लाखाचा प्रस्ताव प्राथमिक स्तरावर सारोग्य सेवा संचालक कार्यालयाकडे पाठविला आहे. परंतु अद्याप कुठल्याही जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागाच्या औषध खरेदीच्या प्रस्तावास मंजूरी मिळाली नाही.