शांती कुंज वरून जिल्ह्यात पोहचला शक्तीकलश

0
6

गोंदिया, दि.१: : गायत्री परिवारातर्फे आगामी २७ ते ३१ डिसेंबर २०१५ रोजी सडक अर्जुनी येथे संपन्न होणाèया १०९ कुंडीय जिल्हास्तरीय गायत्री महायज्ञ व संस्कार महोत्सवासाठी परमपूज्य गुरूदेव आचार्य व हरिद्वार येथील शांती कुंज शक्ती पिठाचे आशिर्वाद प्राप्त व्हावे यासाठी आणण्यात आलेल्या शक्तीकलशचे आगमन जिल्ह्यात झाले आहे.
२५ सप्टेंबर रोजी गोqवदभाउ येडे (गोंदिया), धनराज कोरे (सालेकसा), ज्ञानेश्वर बारसागडे (सडक अर्जुनी), सुखदेव ब्राम्हणकर (देवरी), निर्मला बेन परमार, जनाबाई खेडीकर (गोंदिया), डॉ. बिसेन (गोरेगाव), म्हसके यावलकर (सडक अर्जुनी) मिळून एकूण ५५ युग सेनानीची चमू शक्तीकलश आणण्यासाठी हरिद्वार येथे गेली होती. पं. आचार्य शर्मा यांच्या सुक्ष्म संरक्षणात या शक्तीकलशाचे छत्तीसगड एक्स्प्रेसने २५ सप्टेंबर रोजी गोंदिया येथे आगमन झाले. गायत्री परिवार गोंदियाच्या वतीने कलश यात्रेसह शक्तीकलश गायत्री शक्तीपीठ गोंदिया येथे विधिवत पूजन करून ठेवण्यात आले आहे. येत्या काही दिवसात गायत्री परिवार गोंदियाच्या मार्गदर्शनात हे शक्तीकलश भाविकांच्या दर्शनासाठी सडक अर्जुनी तालुक्यातील १०८, देवरी तालुक्यातील २५, मोरगाव अर्जुनी तालुक्यातील २५, साकोली तालुक्यातील २५, गोरेगाव तालुक्यातील २५ गावात कार्यकत्र्यांच्या उपस्थितीत परिभ्रमणासाठी नेले जाणार आहे. यानंतर सदर शक्तीकलश सडक अर्जुनी येथे होणाèया १०८ कुंडीय गायत्री महायज्ञात ठेवले जाणार आहे. शक्तीकलश व शांती कुंज हरिद्वार येथील आध्यात्मिक उर्जा संकलित करण्यासाठी जिल्ह्यातील भाविकांनी ज्यावेळी शक्तीकलश त्यांच्या गावात येईल. त्यावेळी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन गायत्री परिवार ट्रस्ट व गायत्री शक्ती पीठ गोंदियाच्या वतीने करण्यात आले आहे.