नवेगावबांधात जादूटोणा विरोधी कायदेविषयक मार्गदर्शन

0
8

नवेगावबांध,दि.१: स्थानिक जवाहर नवोदय विद्यालयातील विद्याथ्र्यांद्वारे नवेगावबांध येथील सार्वजनिक गणेश मंडळाच्या माध्यमातून सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
या कार्यक्रमातून देशभक्तीपर नृत्य आण एस. एस. चव्हाण यांच्या मार्गदर्शनात अंधश्रद्घा निर्मूलन करणाèया ढोंगी बाबा व ज्योतिष्याचा भंडाफोड या लघुनाटिका सादर करण्यात आल्या. या कार्यक्रमाच्या अंतर्गत बिना माचिस ने अग्नी पेटवणे, नारळातून नोटा व रेबीन काढणे. जीभेत तार फसवणे, जळता कापूर खाणे, कानाने चिठ्ठयांवरील नाव वाचणे, रूमालात अंगठी गायब करणे इत्यादी वैज्ञानिक प्रयोगाद्वारे समाज प्रबोधन करण्यात आले. संगीत शिक्षक सेलवटे यांच्या मार्गदर्शनात मुलांचा ऑर्केस्ट्रा सादर करण्यात आला. आपल्या भाषणातून मार्गदर्शन करताना प्राचार्य एम. एस. बलवीर म्हणाले, वैज्ञानिक दृष्टीकोनाचा विकास करणे हे प्रत्येक नागरिकांचे कर्तव्य आहे. नवेगावबांधचे उपसरपंच धर्मेश जायस्वाल आणि तंमुसचे अध्यक्ष मुलचंद गुप्ता यांनी यथोचित मार्गदर्शन केले. कार्यक्रमाला नितीन पुगलिया, रमेश गुप्ता, शैलेश जायस्वाल, नरेश जायस्वाल, आशिष जायस्वाल, बंटी गुप्ता, संनी टांक, सचिन उजवणे, भीमराव मोटघरे, संजू भरतीया आदी तसेच मंडळाचे सर्व कार्यकर्ते आणि बहुसंख्य गावकरी उपस्थित होते.