दोन दिवसीय जेसीआई अंचल अधिवेशन शनिवारपासून

0
10

गोंदिया,दि.२-आंतरराष्ट्रीय व्यक्तित्व विकास संस्था ज्युनियर चेंबर इंटरनेशनल इंडिया(जेसीआई)च्या झोन ९ च्या २ दिवसीय अंचल अधिवेशनाचे आयोजन शनिवार ३ ऑक्टोंबरपासून करण्यात आले आहे.अधिवेशन येथील हॉटेल गॅ्रन्ड सीता च्या सभागृहात आयोजित करण्यात आले आहे.यामध्ये विदर्भ,छत्तीसगड व ओडीसा येथील ७०० सदस्य व त्यांचे कुटुंब सदस्य सहभागी होणार आहेत. अधिवेशनाचे उदघाटन आमदार गोपालदास अग्र‹वाल यांच्या हस्ते सकाळी ९ वाजता होणार आहे.पहिल्या दिवशी जेसीस सदस्यांसाठी विविध स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे.सायकांळी आयोजित कार्यक्रमात जेसीस मध्ये उत्कृष्ट कार्य करणाèया सदस्यांचा अंचल अध्यक्ष जेसी मनिष कुरजेकर यांच्या हस्ते सन्मानित करण्यात येणार आहे.या कार्यक्रमाला महाराष्ट्राचे सामाजिक न्याय व विशेष सहाय्य मंत्री राजकुमार बडोले विशेष अतिथी म्हणून उपस्थित राहणार आहेत.अधिवेशनाच्या दुसèया दिवशी ४ आक्टोंबरला अंचल अध्यक्ष आपल्या कार्यकाळातील कामकाजाचा आढावा सादर करतील.तसेच २०१६ करीत नव्या कार्यकारिणीचे गठण करण्यात येणार आहे.या अधिवेशनात जेसीआईच्या सर्व सदस्यांना मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन अधिवेशन सचिव जेसी एड.महेश ठकरानी,जेसी वासुदेव रामटेककर यांनी केले आहे.