तिरोड्यात आ.रहागंडालेचा स्वच्छ अभियानात सहभाग

0
7

तिरोडा,दि.2-गेल्या वर्षी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सुरु केलेल्यां स्वच्छ भारत अभियानाला आज (दि.2)एक वर्षपुर्ण झाले.त्यातच महात्मा गांधी जयंतीच्या निमित्ताने आज तिरोड्याचे आमदार विजय रहागंडाले यांनी पुढाकार घेत शहरातील मुख्य परिसरात तसेच गांधी यांच्या प्रतिमा परिसरात स्वच्छता मोहिम राबविली.या मोहिमेत आ.रहागंडाले यांनी महात्मा गांधी यांच्या प्रतिमेला स्वतः पाण्याने स्वच्छ केले.सोबतच मुख्य परिसरात झाडूही लावली.त्यांच्यासोबत शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख सुनिल पालांदूरकर,माजी जि.प.उपाध्यक्ष मदन पटले,बाजार समितीचे संचालक,वसंत भगत,स्वानंद पारधी,नितेश पंजवानी,लादेन रहागंडाले यांच्यासह भाजप,सेनेचे पदाधिकारी या स्वच्छता मोहिमेत सहभागी झाले होते.