अश्विन नवरात्रानिमित्त मांडोदेवी येथे भजन स्पर्धेचे आयोजन

0
16

गोंदिया ,दि. ३-अश्विन नवरात्र उत्सवानिमित्त श्री सूर्यादेव मांडोदेवी देवस्थान समिती बघेडा तर्फे १८ ऑक्टोबर रोजी भव्य नि:शुल्क संगीत भजन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे.
स्पर्धा महिला व पुरूष अशा दोन गटात घेण्यात येणार असून ११ रूपये शुल्क भरून नोंदणी करायची आहे. स्पर्धेच्या पुरूष गटात प्रथम बक्षीस स्व. संतोषकुमार अग्रवाल चोपा यांचे स्मृतीप्रित्यर्थ ५ हजार १ रूपये, द्बितीय बक्षीस ३ हजार १ रूपये म्हसगावचे सरपंच गुड्डू बोपचे यांच्याकडून व तृतीय बक्षीस विश्वनाथ असाटी यांच्याकडून २ हजार १ रूपये ठेवण्यात आले आहे. महिला गटाकरीता प्रथम बक्षीस २ हजार ५०१ रूपये कुसन घासले यांच्याकडून, द्बितीय भैय्यालाल qसद्राम यांच्याकडून १ हजार ५०१ रूपये व तृतीय बक्षीस श्यामराव ब्राम्हणकर यांच्याकडून १ हजार १ रूपये ठेवण्यात आले आहे. तसेच उत्कृष्ट पुरूष गायक, महिला गायक, तबला वादक, हार्मोनियम वादक, खंजरी वादक, ताळ वादक यांना प्रत्येकी ५०१ रूपये देण्यात येणार असून ५ प्रोत्साहन बक्षिसे ठेवण्यात आली आहे. स्पर्धेत सहभागी होणाèया एका भजन मंडळात ७ सदस्य असावे, प्रत्येक मंडळास ४ भजन गाण्याची संधी देण्यात येईल, एका मंडळास २० मिनिटांचा वेळ देण्यात येणार आहे. परिक्षकांचे कार्य कृष्ण चंदीवाले, नारायण बहेकार, बबन निखारे, डी. यू. रहांगडाले, येडे गुरूजी, योगेश गौतम पाहणार आहेत. स्पर्धा १८ ऑक्टोबर रोजी सायंकाळी ७.३० वाजेपासून सुरू होणार आहे. स्पर्धेत जास्तीत जास्त भजन मंडळांनी सहभाग घेण्याचे आवाहन श्री सूर्यादेव मांडोदेवी देवस्थान समिती बघेडा तर्फे करण्यात आले आहे.