माहितीच्या अधिकाराचे ज्ञान असणे आवश्यक – डॉ. सूर्यवंशी

0
13

गोंदिया,दि. ५- : सर्वसामान्य नागरिकांना माहितीचा अधिकार अधिनियम २००५ अंतर्गत कार्यालयीन माहिती प्राप्त करता येते. ही माहिती नागरिकांना उपलब्ध करून देतेवेळी संबंधित अधिकाèयांना अडचणी येवू नये. योग्य ती माहिती देता यावी याकरीता यशवंतराव चव्हाण विकास प्रशासन प्रबोधिनी (यशदा) पुणे व जिल्हाधिकारी कार्यालय गोंदियाच्या वतीने तलाठी तथा सहायक जनमाहिती अधिकारीकरीता माहिती अधिकाराचे प्रशिक्षण आज ५ ऑक्टोबरला जिल्हाधिकारी कार्यालयातील सभागृहात आयोजित करण्यात आले होते. दोन दिवसीय आयोजित प्रशिक्षण कार्यक्रमाचे उदघाटन जिल्हाधिकारी डॉ. विजय सूर्यवंशी यांनी केले.
यावेळी निवासी उपजिल्हाधिकार एन. के. लोणकर, अधीक्षक जी.डी. किरीमकर, प्रशिक्षणाच्या संयोजिका आशा तागडे, प्रकल्प अधिकारी सतीश पाटील, मार्गदर्शक अ‍ॅड. भूषण हिरोळे, प्रदिप देशमुख व यशदाचे समन्वयक नितीन राउत उपस्थित होते.