बांधतलावाच्या बचावासाठी आमरण उपोषण

0
15

बांधतलाव जीर्णोद्धार समितीचा इशारा

गोंदिया दि.५: मागील १० वर्षापासून सूर्याटोला येथील निसर्गरम्य बांधतलावातील बुडीत क्षेत्रातील गट क्र.३३० मध्ये भूखंड माफियांनी भ्रष्ट अधिकाNयांना हाताशी पकडून या जागेचा एन.ए.करून घेतला तसेच या तलावातील पाणी वाहून जाणाNया वेस्ट वेअर वर भिंत बांधून या तलावाच्या अस्तित्वाला धोका निर्माण करणाNयांवर कार्यवाही करण्यात यावी. चुकीने करण्यात आलेले एन.ए. रद्द करून संबंधीत दोषी अधिकाNयांवर कारवाई करावी, यासाठी मागील १० वर्षापासून संघर्ष करणाNया बांध तलाव जिर्णोद्धार समितीने आता संबंधितांवर कारवाई न झाल्यास येत्या २२ ऑक्टोंबरपासून जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आमरण उपोषण करण्याचा इशारा सूर्याटोला येथील बुद्धविहारात आयोजित पत्रकार परिषदेत दिला आहे. या पत्रपरिषदेला समितीचे संचालक धन्नालाल सदाराम सूर्यवंशी, समितीचे अध्यक्ष नयनकुमार खोब्रागडे, उपाध्यक्ष केवलचंद गौतम व इतर पदाधिकारी उपस्थित होते.
सेवानिवृत्त शिक्षक धनलाल सूर्यवंशी यांनी दिलेल्या माहितीप्रमाणे १३ एप्रिल २००५ मध्ये बांधतलाव जिर्णोद्धार समितीची स्थापना करण्यात आली. सूर्याटोला येथील बांधतलाव कुडवा येथील मालगुजार बिसेन यांच्या मालकीचा होता व सुमारे ८० एकरात पसरलेला होता. या तलावाचे पाणी नागरा, कटंगी, कुडवा येथील शेतीसाठी वापरले जायचे. सिलींग कायद्यामुळे या तलावाची मालकी शासनाकडे आली. मात्र या तलावावर अतिक्रमण करण्याचे प्रमाण वाढले. तेव्हापासूनच गावकNयांनी विरोध केला व या संदर्भात तक्रार दाखल केली होती. या प्रकरणी विभागीय आयुक्त नागपूर यांनी १७ मार्च २०१५ रोजी जिल्हाधिकारी गोंदिया यांना या प्रकरणी चौकशी करून तातडीने कार्यवाही करावी, अशी सूचना केली होती. या दरम्यान शासनाच्या वतीने रोहयो अंतर्गत या तलावाला खोल करण्याचा प्रस्ताव मंजूर करण्यात आला. तसेच खोलीकरण व सौंदर्यीकरण अंतर्गत तलावाच्या पाळीची दूरूस्ती करण्यात आली. या तलावाच्या काठावर मोक्षधाम उभारण्यात आले आहे. या तलावात आता पाणी असल्याने परिसरातील भूामिगत पाण्याची पातळी वाढली आहे. सकाळी व पहाटे या परिसरात शेकडो नागरिक ‘मॉर्निंग वॉक’साठी येतात. हा परंपरागत तलाव कायम रहावा, अशी गावकNयांची मागणी आहे.
मात्र, अद्याप जिल्हाधिकारीकडून या प्रकरणाची चौकशी करण्यात आलेली नसल्याने बांध समितीने मागणी केली आहे की, ज्या अधिकाNयांनी ही तलावाची जागा गैर मार्गाने एन.ए.केली. त्या अधिकाNयांवर कार्यवाही करण्यात यावी, तसेच करण्यात आलेले एन.ए. रद्द करण्यात यावे, यासाठी समितीचे संचालक धनलाल सूर्यवंशी यांनी २२ ऑक्टोंबरपासून जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आमरण उपोषण करण्याची घोषणा केली आहे. या उपोषणाला समितीचे अध्यक्ष नयनकुमार खोब्रागडे, उपाध्यक्ष केवलचंद गौतम, सचिव के.व्ही.कावळे, सदस्य सिताराम लांजेवार, मुकेश चन्ने, चिंधुजी वाढीवे, बुधराम काळे, महादेव गाते, गणपती बघेले, अजाबराव धोटे, धनलाल रहांगडाले, मुलचंद रहांगडाले, दामोदर रहांगडाले, मालनबाई गजभिये, विनोद गजभिये व रवि काकडे यांनी पाठिंबा दर्शविला आहे.