ग्रंथालय अनुदानाप्रती शासन उदासीन

0
12

सडक अर्जुनी दि.११-: : सार्वजनिक ग्रंथालयाना अनुदानाचा पहिला हप्ता साधारणत: ऑगस्ट-सप्टेंबरमध्ये मिळतो. सप्टेंबर लोटूनही पहिल्या हफ्त्याची तरतूद नाही. मागील वर्षी अनुदानाचा पहिला हप्ता ऑक्टोबरपासून तर मार्चपर्यंत तीन टप्यात मिळाला असे आजपर्यंत कधीच घडले नाही. फेब्रुवारी-मार्चमध्ये मिळणारा अनुदानाचा दुसरा हप्ता जुलैपर्यंत दोन टप्यात मिळाला.
ग्रंथालयांना मिळणारे अनुदान तटपुंजे असून वेळेवर मिळत नाही.एकंदर शासन सार्वजनिक ग्रंथालयाप्रती उदासीन आहे असे प्रतिपादन महाराष्ट्र राज्य ग्रंथालय संघ मुंबईचे अध्यक्ष शिव शर्मा यांनी व्यक्त केले. सडक अर्जुनी तालुक्यातील ग्रंथालय कार्यकर्ते व कर्मचार्‍यांची एक दिवसीय कार्यशाळा सरस्वती सार्वजनिक वाचनालय डव्वा येथे घेण्यात आली. कार्यशाळेचे उद््घाटन जिल्हा ग्रंथालय अधिकारी खुमेंद्र बोपचे यांनी केले. अध्यक्षस्थानी महाराष्ट्र राज्य ग्रंथालय संघ मुंबईचे उपाध्यक्ष शिव र्श्मा होते. पाहुणे म्हणून नागपूर विभागीय ग्रंथालय संघ नागपूरचे सदस्य वाय.डी. चौरागडे, गोंदिया जिल्हा ग्रंथालय संघ गोंदियाचे सदस्य नेपाल पटले, शारदा वाचनालय गोंदियाच्या सहायक ग्रंथपाल चित्रा ढोमणे, गोंदिया जिल्हा ग्रंथालय संघ गोंदियाचे उपाध्यक्ष डॉ. श्रावण उके, प्रगत सार्वजनिक वाचनालय सडक अर्जुनीचे सचीव अजय लांजेवार, सरस्वती सार्वजनिक वाचनालय डव्वाचे अध्यक्ष एच.आर.चौधरी होते.